आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात किमान १३ ते १४ जिल्ह्यांत अफूची बेकायदेशीर शेती होत आहे. तेलंगण, मध्य प्रदेश, छत्तीसगड व कर्नाटकला लागून असलेल्या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. अफू व्यापारातील एजंट दुर्गम, डोंगराळ भागातील गरीब शेतकऱ्यांना अफूचे पीक घेण्यास मन वळवतात. तयार माल ६० हजार ते १.२० लाख रु. किलोने विकत घेतात. शेतकऱ्याची एकरी १२ ते २४ लाख कमाई होते. मात्र, कारवाई झाल्यास एजंट बाजूला, शेतकऱ्यांना १० वर्षांपर्यंतची शिक्षा होते. वर प्रचंड दंडही होतो. जवळपास प्रत्येक राज्यात अशी शेती होते. महाराष्ट्र याचे हब आहे. नंदुरबार, धुळे, अमरावती, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, सांगली या जिल्ह्यांत अफूची सर्वाधिक शेती होते. हे जिल्हे मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण व कर्नाटक सीमेलगत आहेत.
1. पैशासाठी शेती केली
बेकायदेशीर असूनही पैशासाठी लागवड केली, पण पोलिस कारवाई झाली. भाऊ ३ वर्षांपासून जेलमध्ये आहे. पैसे मिळाले नाहीतच, उलट केससाठीच पैसे चाललेत. - पहिला शेतकरी
2. एजंटने हात वर केले
तेलगू एजंटने पोलिसांपासून संरक्षणाची हमी दिली. मात्र, काढणीलाच कारवाई झाली. आता एजंटचा फोन बंद आहे. आम्ही अडकलो. तिघांचा जामीनही होत नाही. - दुसरा शेतकरी
3. याेजना सांगून फसवले
सरकारी योजना असल्याचे सांगून एजंटने कागदपत्रही दाखवले. पैशाचे आश्वासन दिले म्हणून अफू लावली पण कारवाई झाली. घरातील दोघे आता जेलमध्ये आहेत. - तिसरा शेतकरी
तक्रार झालीच तर शिक्षेची भीती, तरी पत्करतात जोखीम
मराठवाडा, विदर्भातील शेतकरी अडकतात तस्करांच्या जाळ्यात पोलिस कारवाई झाल्यास १० वर्षापर्यंत शिक्षा, कठोर दंडही
पैसे बुडवल्याची तक्रारही करता येत नाही. अडचणी नकोत म्हणून एजंट खसखस नेतात. केस स्टडीज : दिव्य मराठीने अफूच्या शेतीमुळे कारवाईला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांची नावे गोपनीय ठेवली आहेत.
अफूतून बक्कळ कमाई
एकरी ३ ते ३.५ किलो बिया एजंट देतो. बोंडातील लॅटेक्सपासून अफू निघते.
एकरी २० ते २२ किलो लॅटेक्स निघते. प्रारंभी एजंट ६० हजार ते १.२० लाख भाव सांगतात. १२-२४ लाख अपेक्षित असताना प्रत्यक्ष ८-१० लाख देतात.
नेमक्या गावांचा शोध
दुर्गम, तांडे, पाड्यातील शेतकरी अफूचे एजंट टार्गेट करतात. गावात वाद, भांडणे असतील तर तक्रार होऊ शकते म्हणून ती गावे टाळतात. पकडलेे गेले तर शेतकरीच अडकतात. १० वर्षांपर्यंतची शिक्षा होते. शेतकऱ्यांनी सावध राहावे. -डॉ. कांचन चाटे, पोलिस उपअधीक्षक (नि.)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.