आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:गोदावरी पात्रातून अवैध वाळूचा उपसा सुरूच; प्रभारी तहसीलदारांचे दुर्लक्ष

पैठण23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठणच्या गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळूचा पुन्हा बेसुमार उपसा सुरू झाला आहे. प्रभारी तहसीलदार व अवैध वाळूविरोधी पथक कागदावर असल्याने हा प्रकार होत आहे. आपेगाव, दादेगाव, टाकळी अंबड या ठिकाणांहून अवैध वाळूचा उपसा वाढला आहे. प्रभारी तहसीलदार शंकर लाड यांच्या नेतृत्वातील वाळूविरोधी पथकाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. एमआयडीसी व पाचोड पोलिसांच्या हद्दीतून पाटेगाव-मुंगी रोडवर दादेगाव शिवारात वाळूच्या वाहनांची गोदापात्रातून रात्रभर वाहतूक सुरू असतेे.

बातम्या आणखी आहेत...