आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:औंढा नागनाथ येथे उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून दारूविक्री, विक्री त्याने चक्क ताडपत्रीचा तंबू ठोकला

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्पादन शुल्क विभाग बडया विक्रेत्याच्या हातातील बाहुले

औंढा नागनाथ येथे एका मद्यविक्रेत्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून चक्क तंबू ठोकून दारू विक्री सुरू केली आहे.  या प्रकारामुळे  त्रस्त झालेल्या नागरिकांनी सदरील दुकानदाराचा परवाना तातडीने रद्द करण्यासाठी   शुक्रवारी (ता.१९) जिल्हा प्रशासनाला साकडे घातले आहे.

औंढा नागनाथ येथे एका दारूविक्री त्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना दिला आहे. मात्र सदर परवाना देताना उत्पादन शुल्क विभागाने डोळेझाक करून सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता उत्पादन शुल्क विभागाने परवाना दिल्याचा आरोप मागील काही दिवसापासून केला जात आहे. या संदर्भात तक्रारी केल्यानंतरही ही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून डोळेझाक केली जात आहे.

दरम्यान उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अभय मिळाले असल्यामुळे संबंधित दुकानदाराने चक्क ताडपत्रीचा तंबू ठोकून दारू विक्रीला सुरुवात केली आहे. त्यामुळे या भागात तळीरामांची गर्दी वाढू लागली असून त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे वैतागलेल्या नागरिकांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून रीतसर तक्रार केली आहे. या भागातील नागरिक मोहम्मद फैयाजोदीन,  श्रीराम राठी, रामनिवास राठी, लक्ष्मण पवार, प्रवीण सोनी, सुनील मस्के यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन दिले आहे .संचारबंदी च्या काळातही दारू विक्रेत्याकडून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदरील दुकानदाराचा परवाना तातडीने रद्द करावा अशी मागणीही करण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभाग बडया विक्रेत्याच्या हातातील बाहुले

राज्य उत्पादन शुल्क विभाग हिंगोलीतील एका बड्या दारूविक्रेत्याच्या हातातील बाहुले बनल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित दारू विक्रेत्याच्या "संस्कारा" वर उत्पादन शुल्क विभाग निर्णय घेतो असा आरोपही केला जाऊ लागला आहे. संचार बंदीच्या काळात जिल्ह्यात सर्रासपणे देशी दारू सोबतच गावठी दारू विक्री झाली. याबाबत गुन्हे दाखल झाले मात्र उत्पादन शुल्क विभागाने या प्रकारात साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या कामगिरीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...