आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमआयडीसीच्या अंतर्गत व मुख्य मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवा, अशी मागणी छावा संघटनेतर्फे एमआयडीसी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. तसेच लवकर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मार्कंडे यांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
वाळूज औद्योगिक परिसरात प्रवेश करताना तिरंगा चौक, पंढरपूर येथील मुख्य मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक कामगार-उद्योजकांचे अपघात झाले आहेत. तिरंगा चौक ते गुडइयर टायर कंपनी रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. मोरे चौक व प्रताप चौकातील खड्डे बुजवण्याचे काम करणाऱ्या एमआयडीसी प्रशासनाने कारखान्यांच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांकडेसुद्धा लक्ष द्यावे, असा सल्लाही निवेदनातून जिल्हा उपाध्यक्ष मनोहर सनेर, नवनाथ काळे, गिरीधर चव्हाण, योगेश सोनवणे, दिनेश आमगे आदींनी दिला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.