आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची खरडपट्टी:त्वरित चौथ्या दिवशी पाणी द्या, याचा अर्थ दीड महिन्याने होत नाही : खंडपीठ

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तहानलेल्या शहराला किमान चौथ्या दिवशी तरी नियमित पाणीपुरवठा करा, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने मागील सुनावणीत मनपाला दिले होते. सोमवारी (१२ सप्टेंबर) न्यायालयाने पुन्हा ती आठवण करून दिली. त्यावर चौथ्या दिवशी पुरवठा करण्यासाठी अथक परिश्रम सुरू आहेत. मात्र त्यासाठी अजून दीड महिना तरी लागेल, असे मनपाच्या वकिलांनी सांगितले. त्यावर ‘त्वरितचा अर्थ दीड महिन्याचा कालावधी असा होत नाही,’ अशा शब्दांत न्या. रवींद्र घुगे व न्या. अरुण पेडणेकर यांनी खरडपट्टी काढली.

१.३२ लाख अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाईचे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्यानुसार तीन पथकांमार्फत १२३५ अनधिकृत नळजोडण्या बंद केल्या आहेत. चौधरी कॉलनीत एका नगरसेवकाच्या गल्लीतील ४० बेकायदा नळ तोडले. तसेच अभय योजनेतून १७९ जोडण्या अधिकृत केल्याचा अहवाल अॅड. संभाजी शिंदे यांनी सादर केला. त्यानंतर पाणीपुरवठा वाढीसाठी मनपा करत असलेल्या प्रयत्नांबाबत खंडपीठाने समाधान व्यक्त केले.

खंडपीठाची विचारणा
मनपाच्या परिश्रमांबद्दल अभिनंदन करायला हवे, पण चौथ्या दिवशी पाणीपुरवठा झाला तर जास्त समाधान होईल.
शहरात दर चौथ्या दिवशी पाणी देण्याबाबत आदेश दिले होते. त्याला अजून किती दिवस लागू शकतील?
त्वरित काम करा असे सांगितले होते. ‘त्वरित’चा अर्थ
दीड महिना कालावधी असा असतो का ?

मनपाची उत्तरे
मागणी, पुरवठ्यात मोठा फरक असल्याने खूपच कठीण जात आहे. प्रयत्न सुरू आहेत पण हे काम खडतर आहे.
या कामासाठी आम्ही अथक परिश्रम करीत आहोत. पण अजून किमान दीड महिना तरी लागेल.
माननीय न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

बातम्या आणखी आहेत...