आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षित विसर्जनाचे 'दिव्य मराठी'चे आवाहन:गणरायाच्या गजरात आज डुंबून जा, काळजीही घ्या; ऑगस्टमध्ये बुडून 37 जण दगावले

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात पुरात वाहून जाणे, नदीपात्रात बुडून दगावणेे असे अपघात होत असतात. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात पोहण्यासाठी किंवा पर्यटनासाठी गेले असता बुडून दगावणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. एकट्या ऑगस्ट महिन्यात राज्यात असे ३७ अपघात झाले असून त्यात ५५ जणांचा मृत्यू झाला. म्हणजे बुडून मृत्यूंची सरासरी दररोज एक घटना घडत होती आणि त्यात प्रतिदिन दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या सर्व घटनांत दगावलेले १५ ते ३० वयोगटातील तरुण पुरुष आहेत.

पोहण्यास गेलेल्यांचे जास्त मृत्यू

बुडून मृत्यू झालेल्या ऑगस्ट महिन्यातील ३७ घटनांमागील कारणांचे विश्लेषण केले असता त्यातील २२ घटना पोहण्यासाठी गेले होते. त्याखालोखाल ६ प्रसंग पर्यटनासाठी गेलेल्या, मित्रांसोबत फिरायला गेलेल्या, सेल्फीच्या नादात तोल जाऊन पाण्यात पडलेल्यांचे आहेत. तसेच चौघेजण कामासाठी गेले असता घसरून पाण्यात पडले.

अपघातांची कारणे
पोहण्यासाठी 22
पर्यटनासाठी 06
घसरून 04
बैल धुण्यासाठी 03
विसर्जनासाठी 02

अपघातांची स्थळे
तलाव/शेततळी 16
नदी आणि नाले 13
धरणे/बंधारे 06
समुद्र 01
विहीर 01

सावध विसर्जन : विसर्जन पथकांसाठी लाइफ जॅकेट्स हवीतच
अत्यंत उत्साहात पार पडलेल्या यंदाच्या गणेशोत्सवास विसर्जनाच्या दिवशी गणेशभक्तांच्या दगावण्याचे गालबोट लागू नये ही सर्वांचीच इच्छा. बैल पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी गेलेल्या ५ जणांचा मृत्यू झाला होता. विसर्जनाच्या दिवशी त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी "दिव्य मराठी'चे हे आवाहन...
मंंडळांसाठी... : - विसर्जन पथकांसाठी लाइफ जॅकेट्स द्या -पाण्यापाशी हुल्लडबाजी करणारे लोक बाहेर काढा
गणेशभक्तांसाठी... : - काठावर उभे राहून सेल्फी, फोटो काढू नका -विनाकारण पाण्यात उतरणे टाळायला हवे

बातम्या आणखी आहेत...