आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थव्यवस्था:व्याजदरवाढीचा गुंतवणुकीवर परिणाम; अमेरिकेतील प्रमुख समभागांचे मूल्य ८२१ लाख कोटी रु. घटले

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वस्त पैशाचे युग संपले आहे. शेअर्सचे भाव खडतर काळातून जात आहेत. मालमत्ता बाजारात अशी वाईट परिस्थिती क्वचितच पाहायला मिळाली. नव्या जगात असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यांना पैसे गुंतवण्यासाठी नवीन नियमांची गरज भासेल. प्रमुख अमेरिकन शेअर्सचा एस. अँड पी. ५०० निर्देशांक या वर्षी सर्वात कमी बिंदूवर आहे. कंपन्यांच्या बाजारमूल्यात ८२१ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. सहसा शेअर बाजारापासून संरक्षण देणारे सरकारी रोखेदेखील वाईट स्थितीत आहेत. सरकारी तिजोरीसाठी १९४९ नंतरचे सर्वात वाईट वर्ष आहे. व्हँकुव्हरपासून सिडनीपर्यंत श्रीमंत देशांत घरांच्या किमती घसरल्या. बिटकॉइन उद्ध्वस्त झाला आहे. सोन्याची चमक फिकी पडली आहे. मात्र, युद्धामुळे विविध वस्तूंसाठी वर्ष चांगले गेले. २००७-०९ च्या जागतिक आर्थिक संकटानंतर केंद्रीय बँकांनी अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी व्याजदर कपात केली. दर घसरल्याने इतर मालमत्तेचे मूल्य वाढले व शेअर बाजारांनी नवा उच्चांक गाठला. एस. अँड पी. ५०० इंडेक्स २००९च्या तळातून २०२१ मध्ये शिखरावर जाईल. उद्यम भांडवलदारांनी सर्व प्रकारच्या नवीन कंपन्यांमध्ये प्रचंड पैसा टाकला. जगभरातील खासगी बाजारांचा आकार चौपटीने वाढला. खासगी इक्विटी, मालमत्ता, पायाभूत सुविधा व खासगी कंपन्यांनी दिलेली कर्जे यातील गुंतवणूक ८०० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या वर्षातील नाट्यमय उलाढालीत व्याजदरातील वाढीचा मोठा वाटा आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने १९८० नंतर प्रथमच एवढी कठोर पावले उचलली आहेत. श्रीमंत देशांमध्ये गेल्या ४० वर्षांत सर्वात जलद दराने किमती वाढल्या आहेत. महागड्या पैशाच्या जमान्यात गुंतवणूकदार नवीन नियमांनुसार चालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना तीन नियमांचा विचार करावा लागेल. पहिली म्हणजे पुढे जाऊन परतावा जास्त असेल. २०१० च्या दशकात व्याजदरात घट झाल्यामुळे भविष्यातील उत्पन्नाचे भांडवली नफ्यात रूपांतर झाले. उच्च किमतींचा तोटा कमी परताव्याच्या संभाव्यतेशी संबंधित आहे. मात्र, यंदाच्या भांडवली तोट्यामागे सोनेरी चमक दडलेली आहे. भविष्यातील परतावा वाढला आहे. दहा वर्षांच्या ट्रेझरी सिक्युरिटीजने गेल्या वर्षी १% किंवा कमी उत्पन्न दिले. आता ते १.२% आहे. असे रोखे घेणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात भांडवली तोटा सहन करावा लागला आहे. पण, भविष्यात चांगला परतावा मिळेल.

दुसरा नियम म्हणजे गुंतवणूकदारांची क्षितिजे संकुचित झाली आहेत. चढ्या व्याजदरामुळे ते हतबल होत आहेत. यामुळे तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती घसरल्या आहेत. एस. अँड पी. ५०० मध्ये समाविष्ट पाच मोठ्या टेक कंपन्यांच्या शेअरच्या किमती यावर्षी ४०% खाली आहेत. नवीन कंपन्यांऐवजी जुन्या कंपन्यांना अनुकूल वातावरण असल्याने युरोपियन बँकिंगसारख्या जुन्या व्यवसाय मॉडेलला नवजीवन मिळेल. अडचणीत असलेल्या प्रत्येक कंपनीला पैशांची कमतरता भासणार नाही, मात्र आता रक्कम कमी होणार आहे. ज्यांच्या किमती जास्त आहेत आणि नफा दूर आहे अशा कंपन्यांपासून गुंतवणूकदार सावध राहतील. टेस्लाला मोठे यश मिळाले आहे, पण आता जुन्या कार निर्मात्यांची परिस्थिती चांगली होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून ते पैसे काढू शकतील. तिसरा नियम म्हणजे गुंतवणुकीच्या धोरणात बदल होईल. २०१० नंतर खासगी कर्ज ८२ लाख कोटी रुपयांच्या शिखरावर पोहोचले होते. असे असले तरी आता खासगी गुंतवणुकीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वाढीव व्याजदर आणि भांडवली तुटवडा या नव्या परिस्थितीशी गुंतवणूकदारांना जुळवून घ्यावे लागेल. त्यांना दीर्घकालीन परिस्थिती लक्षात ठेवावी लागेल. खासगी मालमत्तेचे मूल्य फुगवले जाते खासगी मालमत्तेचे परिणाम अतिशयोक्तीचे आहेत. जागतिक स्तरावर खासगी इक्विटी फंडांच्या मालकीच्या कंपन्यांचे मूल्य ३.२% वाढले, तर एस. अँड पी. ५०० चे मूल्य २२.३% घटल्याचा अंदाज आहे. खासगी निधीच्या मालमत्तेचा शेअर बाजारात व्यवहार होत नाही. त्यांचे मूल्य त्यांच्या व्यवस्थापकावर अवलंबून असते. ते त्यांचे मूल्य कमी लेखत नाहीत, कारण त्यांची फी त्यांच्या मूल्याशी संबंधित आहे. तथापि, नोंदणीकृत कंपन्यांच्या मूल्यांची घसरण खासगी मालकीच्या व्यवसायांमध्येही जाणवेल. आगामी काळात खासगी मालमत्तांच्या गुंतवणूकदारांनाही तोटा सहन करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...