आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षत्रवाडीजवळ 1400 मिमीची जलवाहिनी फुटली:जुन्या शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नक्षत्रवाडी येथील १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी बुधवारी (१ फेब्रुवारी) फुटली. त्यामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जलवाहिनीचा पत्रा फाटल्यामुळे वेल्डिंगचे काम हाती घेण्यात आले. ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे जुन्या शहरातील अनेक भागांना उशिरा पाणी मिळण्याची शक्यता आहे.

रेल्वेस्टेशन उड्डाणपुलाखालून गेलेल्या १४०० मिमी जलवाहिनीचा पत्रा कापला गेल्याने पाण्याचा लोंढा नाल्यातून वाहू लागला. अर्धा तास लाखो लिटर पाणी नाल्यातून वाहून गेले. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे, उपअभियंता एम. एम. बाविस्कर, कनिष्ठ अभियंता आशिष वाणी, सुहास लोहाडे, नूर कन्स्ट्रक्शनचे कामगार तातडीने जलवाहिनी फुटली त्या ठिकाणी दाखल झाले. फारोळा येथील शंभर एमएलडीचे दोन पंप बंद करण्यात आले. जलवाहिनी पूर्णपणे रिकामी करून वेल्डिंगचे काम हाती घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...