आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर अशा सहा महानगर क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. या प्रवेश प्रक्रियेत विविध शिक्षण मंडळाचे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यामध्ये काही मंडळाचे दहावीच्या गुणपत्रिका श्रेणीमध्ये आहेत, त्या श्रेणीचे गुणांमध्ये रुपांतर करणे यासह गुणपत्रके, गुणवत्ता यादी व एटीकेटी प्रवेशाबाबत निकष पुर्ण करण्याच्या सूचना बुधवारी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत.
कोरोनामुळे अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेस विलंब झाला आहे. यंदाच्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत भारताबाहेरील तसेच इतर राज्यातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छुक आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. इतर राज्यातील प्रमाणपत्र श्रेणी स्वरुपात आहेत, ज्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी दहावीच्या श्रेणीचे गुणांमध्ये रुपांतर करायचे आहे. गुणांमध्ये रुपांतर करताना दिलेल्या ग्रेड स्केलमधील मध्यबिंदू ग्राह्य धरायचा आहे. सीबीएसईसाठी प्रचलित पद्धतीनुसार मुख्य पाच विषयाचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुविधा -
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी अतिरिक्त गुण आणि पुर्नतपासणीसाठी एसएससी बोर्डाकडे अर्ज केले होते. त्यानुसार ज्या विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल अथवा वाढ झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांना सुधारीत गुणांची नोंद करणे, गुणपत्रक आणि प्रमाणपत्र अपलोड करण्याची सुविधा संकेतस्थळावर शिक्षण उपसंचालक लॉगिनमध्ये देण्यात आली आहे.
एटीकेटी पात्र विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश -
एटीकेटीत सवलत मिळून इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीनंतर स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना विशेष फेरी अलॉटमेंटनंतर अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरण्यासाठी विकल्प देण्याची सुविधा देण्यात येणार असल्याची सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.