आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनचे आगमन:औरंगाबदमध्ये 65 मिमी पर्जन्यमान होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई नको; 11 दिवसांत 17.2 मिमी पावसाची नोंद

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये 65 मिमी पर्जन्यमान होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नका. अन्यथा दुबार पेरणीचे संकट उदभवू शकते, अशी भीती आवाहन हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ​​​​​सध्या ​​मान्सूनचा हंगाम सुरू झाला आहे. 1 ते 11 जून सकाळी 8.30 वाजेपर्यंत मराठवाड्यात अपेक्षित 49.1 मिमी च्या तुलनेत 17.2 मिमी म्हणजे 35 टक्केच पाऊस पडला. गतवर्षी 81.1 म्हणजेच 165.2 टक्के पाऊस झाला. त्या तुलनेत 130 टक्के पर्जन्यमान कमी झाले आहे. अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही.

मान्सूनची वेगाने वाटचाल

यंदा लवकर व सरासरी इतका व सरासरी पेक्षा 5 टक्के जास्त पर्जन्यमान होण्याचा अंदाज हवामान संस्था, हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. त्यानुसार केरळमध्ये लवकरच मान्सून दाखल झाला होता, पण पुढील वाटचालीसाठी अडथळे निर्माण झाल्याने मान्सून रेंगाळला. परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरणाचा अभाव राहिला. परिणामी मराठवाड्यात खूपच कमी म्हणजे अपेक्षित 49.1 मिमी च्या तुलनेत केवळ 17.2 मिमी प्रत्यक्षात पाऊस पडला आहे. मात्र, आता मान्सूनची वाटचाल वेगाने सुरt झाली आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. त्यामुळे औरंगाबादसह अनेक ठिकाणी मेघ गर्जनेसह हलका ते जोरदार पाऊस पडण्याची नोंद झाली आहे. दोन ते चार दिवसांत मान्सून सर्वत्र दाखल होईल. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. असे आवाहन हवामान तज्ज्ञ व कृषी तज्ज्ञांच्या मार्फत केले जात आहे.

कोठे पडेल पाऊस?

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दररोज कुठे ना कुठे पाऊस पडणारच आहे. पण जेथे सापेक्ष आर्द्रता 100 टक्के, कमी हवेचा दाब, बाष्पयुक्त ढगांची गर्दी, स्थानिक तापमान, अरबी समुद्र व बंगालचा उपसागरावरून पाऊस घेऊन येणारे ढगांची गर्दी होईल, तेथेच सर्वाधिक पाऊस पडेल. उर्वरित ठिकाणी कमी पर्जन्यमान व पावसाची तुट राहणार आहे. त्यामुळे स्थळनिहाय पर्जन्यमानात कमालीचा फरक राहिल.

मराठवाड्यातील पर्जन्यमानाचा जिल्हानिहाय आलेख

(जिल्हा - अपेक्षित पर्जन्यमान- प्रत्यक्ष पर्जन्यमान - टक्केवारी)

- औरंगाबाद - 45.9 - 13.8 - 30.1

- जालना - 48.6 - 10.2 - 21.0

- बीड - 47.1 - 20.0 - 42.5

- लातूर - 49.6 - 18.3 - 36.9

- उस्मानाबाद - 46.5 - 33.2 - 71.4

- नांदेड - 57.3 - 14.3 - 25.1

- परभणी - 53.3 - 18.3 - 34.3

- हिंगोली - 62.0 - 12.5 - 20.2

- एकूण - 49.1 - 17.2 - 35.0

दुबार पेरणीचे संकट नको

यंदाचा उन्हाळा सर्वाधिक तापला आहे. जमिनीतील ओलावा, आर्द्रतेत घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 65 मिमी पाऊस होईस्तोवर आणि पुढेही पाऊस पडणार, याचा अंदाज घेऊन खरीप पेरणीचे नियोजन करावे. कोरड्या व अर्धओलाव्यात पेरणी केल्यास उष्णतेने बियाण्याची उगवण चांगली होणार नाही. उष्णतेमुळे व कमी पावसामुळे बियाणे खराब होऊन दुबार पेरणीचे संकट ओढावेल. उत्पादन खर्च वाढेल. याचे भान ठेवून पेरणीची नियोजन करणे हिताचे ठरेल.

बातम्या आणखी आहेत...