आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीस कारावास:धनादेश न वटल्याने आरोपीस कारावास

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या गारखेडा शाखेतून बाबासाहेब शालिकराम गाडेकर (रा. सारा पार्क, सिडको) याने ४० हजारांचे कर्ज घेतले हाेते. हे कर्ज थकीत राहिल्याने त्याने २४६४९ रुपये रकमेचा धनादेश दिला.

फिर्यादीने सदरील धनादेश बँकेत वटवण्यासाठी टाकला असता तो अनादरित झाला. त्यामुळे कलम १३८ नुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले. फिर्यादीची साक्ष होऊन दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून न्यायदंडाधिकारी आर. व्ही. सपाटे यांनी आरोपीस धनादेशांच्या रकमेची दुप्पट नुकसान भरपाई व १ महिन्याचा कारावासाची शिक्षा सुनावली.

बातम्या आणखी आहेत...