आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस देऊनही नामांतर विरोधी कृती समितीकडून कॅण्डल मार्च:खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 1500 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामांतर केल्या नंतर खासदार इम्तियाज जलिल यांच्यासह अनेक संघटनांनी विरोधात उपोषण सुरू केले. त्यातच गुरुवारी सायंकाळी औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट दरम्यान कॅन्डल मार्च काढण्यात आला. परंतु, पोलिसांनी परवानगी नाकारून देखील हा मार्च काढल्या प्रकरणी खासदार इम्तियाज जलिल यांच्यासह पदाधिकारी व दीड हजारांच्या कार्यकर्त्यांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्य सरकार व केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतर करून छत्रपती संभाजीनगर केले. ते रद्द करून औरंगाबाद नाव ठेवण्यासाठी शहरात आठ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले. त्यातच मोहम्मद आयुब जहागीरदार यांनी सिटी चौक पोलिसांकडे प्रांतोष वाघमारे यांच्यामार्फत आंदोलनासाठी परवानगी मागितली होती.

परंतु शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणाखाली या कॅन्डल मार्चला परवानगी नाकारली. शिवाय तीन नाकारून आयोजकांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या नोटिशीनंतर देखील गुरुवारी सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने नागरिक यात सहभागी झाले होते. महिलांचा ही यात शहभाग होता.

जिल्हाधिकारी कार्यालय, लेबर कॉलनी, केले अर्क, आमखास मैदान, टाऊन हॉल, मार्गे भडकल गेट पर्यंत हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. विनापरवानगी मोर्चा काढून घोषणाबाजी पोलिसांनी खासदार इम्तियाज जलील, आयुउब जहागीरदार, आरेफ हुसैनि , नासेर सिद्दीकी यांच्या सह दीड हजारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक उद्धव हाके यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...