आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर अधिकृतपणे नाव वापरण्यास सुरुवात झाली. मात्र नामांतराच्या निर्णयाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. जलील यांनी याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. 4 मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
याबाबत बोलताना जलील म्हणाले की, सरकराने आमच्या जिल्ह्याचे नाव बदलले आहे. मात्र अनेक नागरिकांना वाटत आहे की, शहराचे नाव औरंगाबादच असायला हवे. हा घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे. आमच्याच सरकारला या निर्णयाचे श्रेय मिळावे म्हणून, भाजप आणि शिंदे सरकराने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी आम्ही शनिवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याची माहिती जलील यांनी दिली आहे.
हे उपोषण कोणत्याही राजकीय पक्षाच्या अंतर्गत केले जाणार नाही. तर औरंगाबाद नावाला पसंत करणाऱ्या नागरिकांच्या सहकार्याने हे उपोषण केले जाणार असल्याचे जलील म्हणाले आहे.
आवाज उठवला पाहिजे
इम्तियाज जलील म्हणाले, शहराच्या नामांतराच्या निर्णयाचा अनेक राजकीय पक्षांनी समर्थन केले असून, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने देखील याचे समर्थन केले आहे. त्यामुळे आता नागरिकांना आवाज उठवला पाहिजे. नागरिक आवाज उठवत नसल्याने कोणी काहीही करत नसल्याचे सरकारला वाटत आहे. आम्हाला जे वाटेल ते जनतेला मान्य करावे लागेल. असा समज सरकारचा झाला आहे. त्यामुळे नागरिकांना आपली नाराजी व्यक्त करावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावेच लागणार आहे. ही फक्त आंदोलनाची एक सुरुवात आहे. दिवस आणि रात्र बेमुदत असे हे उपोषण असणार असल्याचे जलील म्हणाले आहे.
प्रशासनाला आवाहन
इम्तियाज जलील म्हणाले, पोलिसांना आणि प्रशासनाला आमचे आवाहन आहे की, आमचे हे लोकशाही पद्धतीने आणि शांततेत आंदोलन असणार आहे. यापूर्वी देखील आम्ही औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती बनवली होती. त्याच कृती समितीच्या अंर्तगत हे आंदोलन होणार आहे. त्यामुळे ज्या पक्ष आणि संघटनांना आमच्यासोबत यायचे आहे. त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला तसे कळवावे. 4 मार्च पासून या उपोषणाला सुरुवात होणार असून, ते किती दिवस चालेल याबाबत सांगता येणार नसल्याचे जलील म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.