आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपला देशात हुकूमशाही हवी आहे. कोणीही त्यांच्या निर्णयाला विरोध करू नये ही त्यांची इच्छा आहे. मी नेहमी खरं बोलतो. त्यामुळे मला आधी टार्गेट करण्यात येतं, अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली. औरंगाबादमध्ये आज सायंकाळी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सभाय. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
नड्डा यांची आज औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा होणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघ डोळ्यासमोर ठेवून नड्डा यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले असून, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अतुल सावे, हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, संजय केनेकर यांची यावेळी उपस्थिती असणार आहे.
देशात हुकूमशाही हवी आहे
खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले की, जे. पी. नड्डांचा दौरा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आहे. हेच त्यांचे काम आहे. खरेतर भारतीय जनता पार्टीची इच्छा आहे की, या देशात विरोधाचा कोणताही आवाज असू नये. त्यांना देशात हुकूमशाही हवी आहे. जे लोकसभा खासदार त्यांच्या निर्णयांना विरोध करतात. त्यांना ते टार्गेट करतात. मी नेहमीच खरे बोलतो, त्यामुळे कदाचित मी त्यांच्या पहिल्या टार्गेटवर असतो, असेही इम्तियाज जलील म्हणाले.
समस्यांवरही बोला
पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, जे. पी. नड्डा यांनी आजच्या आपल्या भाषणात औरंगाबादच्या समस्या आणि विकासावरही बोलावं. लोकांसाठी काम करणं हे माझं काम आहे. असे त्यांनी म्हटले आहे.
मिशन 144 ची सुरुवात
मिशन 144 अंतर्गत भाजपने महाराष्ट्रातील 16 मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात चंद्रपूर, हिंगोली, बुलडाणा, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मिशन 144 च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात चंद्रपुरातून होणार आहे. त्यानंतर औरंगाबादला सायं. 5 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होईल.
सभेच्या कार्यक्रम पत्रिकेत मराठवाड्यतील सर्व महत्त्वाच्या नेत्यांची नावे आहेत. मात्र, मराठवाड्यात होत असलेल्या या महत्त्वाच्या कार्यक्रमातून पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना वगळण्यात आलं आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.