आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहार निकाल:बिहारमध्येही चालला इम्तियाज करिष्मा, खैरे प्रभावहीन; एमआयएम पक्षाचे 5 उमेदवार विजयी, शिवसेना उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

शेखर मगर | औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जातीय गणितांमुळे आम्हाला यश मिळू शकले नाही - शिवसेना

अत्यंत चुरशीच्या बिहार विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष हाेते, पण औरंगाबादकरांना उत्सुकता हाेती दाेन स्टार प्रचारकांच्या कामगिरीची. त्यापैकी एक म्हणजे औरंगाबादचे विद्यमान खासदार, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील अन‌् दुसरे शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे. औरंगाबादेत एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या या दाेन्ही नेत्यांनी बिहारच्या रणधुमाळीत आपापल्या पक्षाच्या उमेदवारासाठी धडाकेबाज प्रचार केला. मात्र लाेकसभा निवडणुकीप्रमाणे इथेही इम्तियाज यांच्या पदरी यश आले अन‌् खैरेंच्या पदरी मात्र अपयश.

इम्तियाज यांनी २० ठिकाणी सभा, रॅली घेतल्या. त्यापैकी त्यांचे ५ उमेदवार विजयी झाले. खैरे यांनी २२ मतदारसंघांत सभा घेतल्या. पण त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. इतकेच काय तर शिवसेनेच्या २१ उमेदवारांना ‘नाेटा’पेक्षाही कमी मते मिळाली. राज्यातील वंचित बहुजन आघाडीनेही बिहारमध्ये उमेदवार दिले हाेते, मात्र त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.

जातीय गणितांमुळे अपयश

शिवसेनेच्या सेवा, सुरक्षा आणि विकास या त्रिसूत्रीचा नितीशकुमार यांनीही वापर केला. गुंडाराज नको म्हणत बिहारमधील मध्यमवर्गाने तर दारूबंदीच्या मुद्द्यावर महिलांनी ‘एनडीए’ला कौल दिल्याचे दिसते. रोजगाराच्या मुद्द्यावर तरुणांनी तेजस्वी यादव यांच्या पक्षाला मतदान केल्याचे दिसते. जातीय गणितांमुळे आम्हाला यश मिळू शकले नाही. -बंडू ओक, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना (खैरेंसाेबत बिहारमध्ये प्रचारात सहभागी)

समाधानकारक निकाल

पक्षाध्यक्ष ओवेसी, मी आणि महाराष्ट्र-हैदराबादेतील नेते, कार्यकर्ते दहा दिवस बिहारमध्ये तळ ठोकून होताे. काँग्रेसने फक्त भाजपला विजयी करण्यासाठी उमेदवार उभे केले हाेते. काँग्रेसने केेलेल्या मतविभागणीचा फटका ‘एमआयएम’च्या किमान दहा उमेदवारांना बसला. तरीही एकूण निकाल आमच्यासाठी अतिशय समाधानकारक आहेत - इम्तियाज जलील, खासदार, एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...