आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण VIDEO:औरंगाबादमध्ये कव्वाली कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पाडला नोटांचा पाऊस

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कार्यकर्त्यांनी पैसे उधळल्याचे समोर आले आहे. औरंगाबादमध्ये हा प्रकार घडला.

जलील यांच्यावर नोटा उधळल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याची खुसखुशीत चर्चा सुरूय.

नेमके प्रकरण काय?

औरंगाबादमधील आमखास मैदानावर दुवा फाउंडेशनतर्फे इम्तियाज जलील उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शुक्रवारी रात्री उशिरा सुफी कव्वालीचा कार्यक्रम रंगला. हा कार्यक्रम संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पाडला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. यापूर्वी खुलताबाद येथेही जलील यांच्यावर अशीच नोटांची उधळण झाली होती.

नाराजीही व्यक्त

'एमआयएम'चे तत्कालीन औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीचे डिसेंबर 2021 मध्ये औरंगाबादेत लग्न झाले. यावेळीही कव्वालीच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर नोटांची उधळण झाली होती. खुलताबाद येथील कव्वालीच्या कार्यक्रमातही असाच प्रकार घडला होता. यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

कार्यक्रम जोरदार रंगला

सुकून बँडने जवळपास बावीस कव्वाली यावेळी सादर केल्यात. त्यात पियाँ हाजी अली पियाँ हाजी अली’, ‘भर दो झोली’, ‘अल्ला हू अल्ला हू…’ यासारख्या कव्वालींना रसिकांनी भरभरून दाद दिली. बँडचे अब्दुल सामी, मृणाल वाहणे, अंकुश बोर्डे, एहतेश्याम आणि विनोद वाव्हळ यांनी दमदार सादरीकरण केले. राहत फतेह अली खानपासून कैलास खेर यांनी गायलेली गाणी यावेळी कलाकारांनी सादर केली.

बातम्या आणखी आहेत...