आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक रुपयामध्ये पिक विमा हा केवळ जुमला:अर्थसंकल्पावर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रीया म्हणाले- शेतकऱ्यांची चेष्टा करणारा निर्णय

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात 3000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली असताना एक रुपयामध्ये शेतकरी बांधवांना पिक विमा देणे हा केवळ एक जुमला आहे, अशी टीका इम्तियाज जलील यांनी दिली आहे. शेतकरी बांधवांना दिल्या जाणार्‍या नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 1000 रुपये प्रति महिना मिळेल हा निर्णय सर्व शेतकरी बांधवांची चेष्टा करणारा आहे, असेही ते म्हणाले.

अर्थसंकल्पावर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रीया दिली असून ते म्हणाले, सरकारने महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक संस्थांना विशेष निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या पिपल्स् एज्युकेशन सोसायटी (पीईएस) च्या माध्यमातुन सुरु करण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थांना विशेष निधी का देण्यात आला नाही ? असा सवालही त्यांनी विचारला. यात विशेष करुन शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाचे असल्यामुळे सरकारने विशेष तरतुद करण्याची आवश्यकता होती.

आशा सेविकांसाठी तुटपुंजी घोषणा

आशा सेविकांचे काम पाहता त्यांना तुटपुंजी मदतीची घोषणा करण्यात आली; किमान 20 हजार रुपये मानधन देणे अपेक्षित होते, असेही जलील म्हणाले.

महाराष्ट्रात स्मारकासाठी 1000 कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. त्याऐवजी हा निधी ग्रामीण भागातील शाळांमध्ये सोयीसुविधा पुरविण्यासाठी आणि विशेष करुन औरंगाबाद जिल्ह्यातील ज्या 1600 शाळा टिनशेड खाली सुरु आहे त्या ठिकाणी पैसे वापरण्यात आले असते.

रस्त्यांची अवस्था बिकट

राज्यातील 5 शहरामध्ये मेट्रोरेल प्रकल्प राबविण्यासाठी 39000 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्याऐवजी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असुन ते पैसे ग्रामीण भागातील रस्त्यासाठी वापरले असते तर याचा थेट फायदा शेतकरी बांधवांना झाला असता. औरंगाबाद जालना रोडवर अखंड उड्डाणपूलासाठी आणि शिवाजी नगर येथील भुयारी मार्गासाठी काही ही तरतुद करण्यात आलेली नाही हे खेदजनक आहे.

रिक्त पदे कुठुन भरणार?

सरकारने महाराष्ट्रात नविन 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मी स्वत: एक जनहीत याचिका दाखल केलेली आहे. ज्यामध्ये सद्यस्थितीत अनेक शासकीय रुग्णालयामध्ये मोठ्या संख्येने डॉक्टर्सची पदे अनेक वर्षापासून रिक्त आहे. मग नविन रुग्णालयामध्ये नविन डॉक्टर्सची पदे कसे व कुठुन भरता येईल याचा विचार सरकारने करावा.

तरतूदींचे स्वागत

औरंगाबादच्या करोडी येथे नविन क्रीडा विद्यापीठासाठी आम्ही जे जनआंदोलन उभे केले होते; त्याच्यासाठी सरकारने 50 कोटीची तरतुद केली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. तसेच औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण करणेस्तव केलेल्या तरतुदींचा सुध्दा आम्ही स्वागत करतो.

बातम्या आणखी आहेत...