आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात विधानसभा निवडणुकीत एमआयएमने १३ जागा लढवल्या. त्यापैकी २ उमेदवार हिंदू होते. पण एकालाही यश मिळाले नाही. सर्व जणांचे डिपाॅझिट जप्त झाले. महाराष्ट्र एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनीही गुजरातमध्ये प्रचार मोहिमेत सहभाग घेतला होता. दारुण पराभवाविषयी ते म्हणाले की, १३ उमेदवारांना मिळून एक लाख मते मिळाली हे महत्त्वाचे. ही आमची सुरुवात आहे. दिल्ली महापालिकेत १५ उमेदवारांना ५० हजार मते मिळाली हेही लक्षात घ्यावे.
एमआयएमने दानीलिमडा मतदारसंघातून कौशिकाबेन परमार, वडगामला (एससी) कल्पेश सुधिया या बिगरमुस्लिमांना तिकीट दिली होते. एकूण १४ जागा लढवण्याची तयारी होती. पण एकाने माघार घेतली. एआयएमआयएममुळे सर्व जागांची समीकरणे बदलतील असे म्हटले जात होते. तसा प्रचार इम्तियाज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. मात्र, मुस्लिम बहुसंख्य असलेल्या गोध्रा तसेच अहमदाबादमध्ये ओवेसींच्या पक्षावर मुस्लिम मतदारांत नाराजी दिसून आली. ती मतपेटीतही समोर आली.
‘ओवेसी गो बॅक’च्या घोषणा प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात एमआयएम मुस्लिम मतांच्या विभाजनासाठीच कार्यरत असल्याची चर्चा सुरू झाली. अहमदाबादसा शाहपूर मिल कंपाउंडमध्ये ‘ओवेसी गो बॅक’च्या घोषणाही देण्यात आल्या. त्या वेळी एमआयएमचे समन्वयक के. आर कोष्टी यांनी पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष साबीरभाई काबलीवाला यांच्यावर ते भाजपबद्दल सॉफ्ट असल्याचा आरोप केला होता. असदुद्दीन ओवेसींशी काबलीवाला आठवड्यातून तीनदा, पण भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्याशी दिवसातून तीन वेळा बोलतात, असेही त्यांचे म्हणणे होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.