आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीकडे तक्रार करा:चंद्रकांत खैरे यांनीच 10 हजार कोटी आणून दिले; खासदार जलील यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला 1 हजार नाही, तर 10 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे हे पैसै शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीच आणून दिले होते, असा हल्लाबोल करत एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरे यांना उत्तर दिले. ते बुधवारी औरंगाबादमध्ये बोलत होते. ​​

शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएम आणि वंचित आघाडीला भाजपने एक हजार कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता. या आरोपाचा खासदार जलील यांनी जोरदार समाचार घेतला. जलील म्हणाले, 1 हजार नाही तर 10 हजार कोटी रुपये आपल्याला मिळाले. हे पैसै चंद्रकांत खैरे यांनीच आणून दिले. मात्र, त्यावेळी खैरेंनी चहापाणासाठी 500 च्या 4 नोटा घेतल्या होत्या. त्या अजून दिल्या नाहीत. त्या त्यांनी दिल्या नाहीत, तर आम्ही ईडीकडे तक्रार करू. आम्हाला पैसे दिल्याची काही माहिती खैरेंकडे असेल, तर त्यांनी ईडीकडे तक्रार करावी, असा आव्हानही त्यांनी दिले.

खैरेंना सीरियस घेण्याची गरज नाही

खासदार जलील म्हणाले की, चंद्रकांत खैरे बोलतात तेव्हा केवळ लोकांचे मनोरंजन होते. त्यामुळे त्यांना सीरियस घेण्याची गरज नाही. भाजप आणि तुम्ही एकत्र निवडणूक लढवली. खैरे स्वत: उमेदवार होते. भाजपने एवढे पैसे कुठून आणले, या संदर्भात खैरेंनी ईडीला पत्र लिहून तक्रार करायला हवी.

भाजपवर जोरदार टीका

जलील म्हणाले की, भाजपकडून पाणीप्रश्नावर खूप मोठे नाटक औरंगाबादेत करण्यात आले. कोणी डान्स करत होते, तर कुणी नाचत होते. 20 वर्षे शिवसेनेसोबत मनपाची सत्ता भाजपकडे असताना त्यांनी केवळ पाणप्रश्नावर नाटक केले, असा टोला भाजपच्या जल आक्रोश मोर्चावरून लगावला.

औरंगाबादला पाणी कधी मिळणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 8 जूनला औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक महामंडळावर सभा आहे. या दिवशी त्यांनी औरंगाबादला पाणी कधी मिळणार यांची घोषणा करावी, अशी विनंती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना करणार आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले.

बातम्या आणखी आहेत...