आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. रफिक झकेरिया क्रिकेट स्पर्धा:युवराज अकादमी, विस्डम अकादमी संघ विजय; अमेय अन् अर्थव ठरले सामनावीर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार इम्तियाज जलील प्रस्तुत डॉ. रफिक झकेरिया क्रिकेट स्पर्धेत युवराज क्रिकेट अकादमी व विस्डम क्रिकेट अकादमी संघांनी विजय मिळवले. शनिवारी नवल टाटा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अमेय भुजबळ व अर्थव तोतला सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले. पहिल्या सामन्यात युवराज अकादमीने एनपी अकादमीवर 9 गड्यांनी मात केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एनपी क्रिकेट अकादमीने 28 षटकांत सर्वबाद 88 धावा उभारल्या. यात सलामीवीर कार्तिक गोहलतने 3 व एम. नदिमने 9 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या झैद खानने संयमी फलंदाजी करत 66 चेंडूंत 1 चौकारसह 13 धावा केल्या. इतर एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. कर्णधार दिपक भोपळाही फोडू शकला नाही. सुशांत वर्माने 8 धावा केल्या. युवराजकडून कर्णधार अमेय भुजबळने 25 धावा देत 4 गडी बाद केले. शिवम पलिवाल व अनिकेत खरातने प्रत्येक 2-2 गडी बाद केले. प्रत्युत्तरात, युवराज अकादमीने 12.5 षटकांत 1 गडी गमावत विजय साकाराला. अष्टपैलू सलामीवीर अमेय भुजबळेने 51 चेंडूंत 11 सणसणीत चौकार खेचत नाबाद 61 धावांची अर्धशतकी विजयी खेळी केली. शिवम पलिवाल 8 धावांवर परतला. मनिष सहानीने 14 चेंडूंत 1 चौकारासह नाबाद 9 धावा केल्या. ओम जाधवने एकमेव बळी घेतला.

विस्डमने लकी अकादमीला हरवले

दुसऱ्या लढतीत विस्डम अकादमीने लकी अकादमीवर 23 धावांनी विजय मिळवला. प्रथम खेळताना विस्डमने 25.3 षटकांत सर्वबाद 133 धावा उभारल्या. यात विवेकने 30 आणि ध्रुव ढेकणेने 29 चेंडूंत सर्वाधिक 41 धावा उभारल्या. लकीकडून मो. आर्यनने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरात लकी संघाचा डाव 21.4 षटकांत 110 धावांवर संपुष्टात आला. यात यासेर बागवानने 23, अबू पटेलने 18, मो. आर्यनने 23 धावा केल्या. विस्डमकडून अर्थव तोतलाने 36 धावा देत 6 गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...