आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर जनमत चाचणी घ्या. यामध्ये लोकांनी जनमतामध्ये औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असा कौल दिला तर तो आम्हाला मान्य असेल जनमताच्या कौलाचा आम्ही आदर करू. मात्र हुकूमशाही पद्धतीने औरंगाबाद चे नामकरण होऊ देणार नाही. बाळासाहेब ठाकरे हे कोणत्या संविधानिक पदावर होते. त्यांच्याकडे कुठलेही संविधानिक पद नसताना त्यांनी औरंगाबादचे संभाजीनगर हे नामकरण कसे केले. केवळ त्यांच्या इच्छेखातर या शहराचे नाव कसे काय बदलले जाऊ शकते,'' असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर या नावाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा विरोध आधीपासून आहे. नामांतराला केंद्राकडून मंजुरी मिळताच इम्तियाज जलील यांनी विरोधी भूमिका अधिक तीव्र करीत आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नामांतर विरोधी समितीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी इम्तियाज जलील यांनी सडेतोड मत व्यक्त केले.
भीतीपोटी लोक प्रतिक्रिया देत नाही
इम्तियाज जलील म्हणाले, औरंगाबादच्या नावानेच मोठ्या प्रमाणात लोक यावेळी लोकांचा कल हा औरंगाबाद या नावाकडेच आहे अनेक जण आम्हाला येऊन औरंगाबाद या नावासाठी आमचा पाठिंबा असल्याची पत्र देत आहेत मात्र मी त्यांना तिथे येऊन औरंगाबादच्या नावासाठी सहभागी व्हा असे आवाहन केले आहे. औरंगाबादच्या सर्वधर्मीय लोकांमध्ये औरंगाबाद हेच नाव हवे असून केवळ भीतीपोटी काही लोक प्रतिक्रिया देत नाही.
बिहारच्या औरंगाबादचे काय?
इम्तियाज जलील म्हणाले, सगळीच नाव बदलायची ठरली तर आधी अहमदाबादचे नाव बदलावे लागेल, बिहारमध्येही औरंगाबाद नावाचे गाव असून तिथेही भाजपचा खासदार आह. मग तेथील नावही बदलावे लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.