आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगजेबाशी आमचा काही संबंध नाही:जलील यांचे शिरसाटांना प्रत्युत्तर; तर जैस्वाल म्हणतात - कबर ओवेसींच्या दारातच करा

छत्रपती संभाजीनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगजेब आणि आमचा काही संबंध नाही. त्याच्याशी आम्हाला काही देण-घेणे नाही. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात खासदार इम्तियाज जलील आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान काही लोकांनी औरंगजेबाचा फोटो उंचावत घोषणाबाजी केली होती यावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे.

दुसरीकडे औरंगजेबाची कबर काढून हैदराबादला ओवेसीच्या दारात करा. जेणेकरून त्याला रोज पहाता येईल, असे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी म्हटले, तर संजय शिरसाट यांनीही ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे करणार असल्याचे म्हटले. यावरून खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या दोन्ही आमदारांवर टीकास्त्र डागले आहे.

शिवसैनिकांना मदतीची गरज पडते?

खासदार जलील म्हणाले की, मला कशाला बोलतो रे बाबा, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कशाला मागणी करताय तुमची सत्ता आहे ना रे बाबा, माझी परवानगी घेणार आहे, का असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला. तुम्ही इतके मोठे नेते आहात, तुम्हाला परवानगीची गरज पडते का, असा सवाल जलील यांनी केला आहे. पंतप्रधानांना पत्र कशाला तुम्ही शिवसैनिक आहात ना, आपण तर शिवसैनिक आहात ना, शिवसैनिकांनी कधी परवानगी घेतली होती का? तुमचे जे बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी कुणाची परवानगी घेतली होती का, असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे. शिवसैनिक आता इतके कमजोर झाले आहे की त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज पडते आहे, असा टोला खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.

आमदार संजय शिरसाट आणि प्रदीप जैस्वाल यांच्या मागणीवर खासदार जलील म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंना कधीच पंतप्रधानांना पत्र लिहण्याची गरज पडली नाही. शिवसैनिकांना मदतीची गरज पडते का? असा सवाल उपस्थित केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशी होती का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...