आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरावे असतील तर चौकशी करा, पण विनाकारण त्रास देऊ नका:PFI वरील कारवाईनंतर इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात 'पीएफआय'वर कारवाईचे सत्र सुरूच आहे. पुरावे असतील, तर चौकशी करा, पण विनाकारण त्रास देऊ नका, अशी प्रतिक्रिया 'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

राज्यभरात एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी मिळून 'पीएफआय'च्या 43 तर देशभरात 247 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतले आहेत.

समर्थन करणार नाही

जलील म्हणाले की, 'एटीएस' त्यांचे काम करत आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी चौकशी करावी, पण विनाकारण कुणाला त्रास देऊ नये. याआधी अनेकांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना दहा-दहा वर्ष कोर्टात राहावे लागले. त्यानंतर कोर्टाने त्यांची निर्दोष सुटका केलेली आहे. असे अनेक उदाहरण आपल्याकडे आहे. म्हणून जर 'एटीएस' किंवा केंद्रीय तपास यंत्रणांकडे पुरावे असतील तर त्यांनी कारवाई करावी. 'पीएफआय' सारख्या संघटनांचे कोणीही समर्थन करणार नाही.

तपास नक्की करावा

एटीएसने ज्यांना ताब्यात घेतले त्यांचे कुंटुंबीय माझ्याकडे येत असून, ते सांगत आहे की, त्यांच्या मुलांनी काहीही केलेले नाही. तरीही त्यांना ताब्यात घेण्यात आले. 'एटीएस' किंवा केंद्रीय यंत्रणांकडे काय पुरावे आहेत हे कुणीही सांगू शकत नाही. त्यांना आणखी काही तपास करायचा असेल तर त्यांनी नक्की करावा.

आजही छापेमारी

राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि ED ने मंगळवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. 'एनआयए'ने दिल्लीच्या शाहीन बागमध्ये छापा टाकून 'पीएफआय'शी संबंधित 30 जणांना अटक केली. शाहीनबागमधील या कारवाईनंतर केंद्रीय पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातून 27, कर्नाटकातील कोलारमधून 6 आणि आसाममधून 25 पीएफआय कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. NIA आणि 9 राज्यांची ATS एकत्र कारवाई करत आहेत.

चौकशी सुरू

NIA महाराष्ट्रातील औरंगाबाद, जालना, सोलापूर आणि परभणी, बीड येथे छापे टाकत आहे. एनआयएने सोलापुरातून 'पीएफआय'च्या सदस्याला अटक केली आहे. 'पीएफआय'च्या कारवायांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. 'एनआयए' त्याला दिल्लीत घेऊन जात आहे, जिथे त्याची अधिक चौकशी केली जाईल. तपास यंत्रणेने 'पीएफआय' प्रमुख मौलाना इरफान नदवी आणि कार्यकर्ता इक्बाल यांना मालेगावमधून अटक केली आहे.

औरंगाबादमधून 14 जणांना अटक

महाराष्ट्र 'एटीएस'ने औरंगाबाद येथून 14 जणांना अटक केली आहे. त्याचवेळी ठाणे गुन्हे शाखेने 'पीआयएफ'शी संबंधित 4 जणांना अटक केली आहे. यापैकी मुंब्रा येथून दोन, कल्याणमधून एक आणि भिवंडीतून एकाला अटक करण्यात आली आहे. हे चौघेही 'पीएफआय'चे सक्रिय सदस्य आहेत. पुणे आणि मुंबईतून 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...