आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती संभाजीनगरवरुन राजकारण तापले:एमआयएमने उपसले उपोषणाचे हत्यार तर समर्थनात मनसेकडून 'स्वाक्षरी मोहीम'

छत्रपती संभाजीनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहराच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजूरी दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगर असे शहर व जिल्ह्याचे नाव बदलण्यात आले आहे. मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी संभाजीनगर या नावाला तीव्र विरोध केला आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर इम्तियाज जलील यांच्यासह शेकडो नागरिकांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. मनसेनेही याविरोधात आणि छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनात स्वाक्षरी मोहीम राबवली.

याबाबत बोलताना जलील म्हणाले की, सरकराने आमच्या जिल्ह्याचे नाव बदलले आहे. मात्र अनेक नागरिकांना वाटत आहे की, शहराचे नाव औरंगाबादच असायला हवेत. हा घाणेरड्या राजकारणाचा भाग आहे. आमच्याच सरकारला या निर्णयाचा श्रेय मिळावा म्हणून, भाजप आणि शिंदे सरकराने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करण्यासाठी आम्ही हे उपोषण सुरु केले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी तीन वाजेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. तर मनसेकडून नामांतराच्या समर्थनात आज स्वाक्षरी मोहीम राबवली सुरुवात करण्यात आली. अशाप्रकारे दोन पक्ष एका निर्णयासाठी मैदानात उतरले आहेत. नामांतरावरुन राजकारण याआधीही झाले होते आणि आता देखील ते सुरुच आहे.

स्वाक्षरी मोहीम.
स्वाक्षरी मोहीम.
बातम्या आणखी आहेत...