आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील दोन दशकांत औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर नुसतीच चर्चा होते, पण अद्यापही तहान कुठलेही सरकार भागवू शकलेले नाही. यापूर्वी समांतर योजनेचे काम सुरू झाले होते, पण राजकीय वादात तीन वर्षांपूर्वी ही योजनाच बंद पडली. आता १६८० कोटी रुपयांच्या योजनेचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र तीही राज्य सरकार पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे केंद्राच्या अमृत योजनेत ती वर्ग करण्यात आली. पण काम इतके संथ सुरू आहे की दोन वर्षांत एक किलोमीटर जलवाहिनीही टाकता आलेली नाही. एकूणच २००४ मध्ये विलासराव देशमुख यांच्यापासून ते आता २०२२ मध्ये उद्धव ठाकरे या मुख्यमंत्र्यांना शहराचा पाणीप्रश्न सोडवता आलेला नाही.
नवीन योजना पूर्ण होण्यास अजून चार वर्षे लागतील. तोपर्यंत पाणीपुरवठा वाढवण्यासाठी जुन्या ७०० मिमी योजनेचे पाइप बदलण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यासाठी १९७ कोटी रुपयांची गरज आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी त्यासाठीचा प्रस्ताव दिला आहे.
शिंदे सरकारकडून आशा
जुन्या पाणीपुरवठा योजनेत जलवाहिनी बदलण्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला तरी हे काम होण्यास किमान एक वर्ष लागेल. शिंदे सरकारने हे काम तातडीने सुरू केल्यास किमान येणाऱ्या उन्हाळ्यात तरी औरंगाबादकरांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.