आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबसने दुचाकीला धडक देऊन एक जण गंभीर जखमी झाला, तर चालकाने प्रसंगावधान राखल्याने बस विद्युत खांबावर अादळण्यापासून वाचली. यात ६० प्रवासी बालंबाल बचावले. हा प्रकार शनिवारी दुपारी बारा वाजता सिल्लोड शहरात घडला. सिल्लोड आगारातून ६० प्रवासी घेऊन चालक शिवाजी वाघ व वाहक गणेश सपकाळ हे बस (एमएच २० बी एल ३७०४) घेऊन निघाले. बस भराडी फाटा पार करून पाचोऱ्याकडे निघाली हाेती. दरम्यान, शहरातीलच मानेवाडी फाट्यावर रजाळवाडीकडून अचानक मुख्य रस्त्यावर बससमोर अालेल्या दुचाकीला (एमएच २० ए एल ५४२७) बसची धडक बसली. यात दुचाकीस्वार जगन शेनफड दुधे (४५, रा. रजाळवाडी) हे जखमी झाले.
चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मोठा अपघात टळला, अन्यथा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मुख्य विजेच्या खांबावर बस आदळून मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघात घडताच मानेवाडीतील नागरिकांनी धाव घेऊन तत्काळ जखमीला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातानंतर काही वेळ या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.
दुचाकीला धडक, ६० प्रवासी बचावले सिल्लोड-पाचोरा फलक असलेल्या बसला अपघात शुक्रवारी (३ मार्च) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सिल्लोड-पाचोरा या बसची व गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीची वांगी फाट्यानजीक वळणावर जोरदार धडक झाल्याने एक ठार, तर ती ३० प्रवासी जखमी झाले हाेते. ही घटना ताजी असतानाच शनिवारी दुसऱ्या दिवशीही सिल्लोड-पाचाेरा बसला पुन्हा अपघात झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.