आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावनोंदणी:जायंट्सने 35 वर्षांत सहा हजार जणांना बसवले जयपूर फूट ; सप्टेंबरदरम्यान होणार शिबिर

औरंगाबाद / रोशनी शिंपीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जायंटस ग्रुप ऑफ औरंगाबादतर्फे ३६ वर्षांपासून शहरात जयपूर फूटच्या माध्यमातून गरजूंना आपल्या पायावर उभे करण्याचे कार्य केले जात आहे. पहिले शिबिर १९८५ मध्ये घेण्यात आले. त्यावेळी १ हजार लोकांनी नोंदणी केली होती, पण त्यापैकी २५० जणांना जयपूर फूट लावले. विशेष म्हणजे जयपूर फूटचे निर्माते डॉ. पी. के. सेठी या वेळी उपस्थित होते. यंदा ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान शिबिर होणार आहे. पहिल्या शिबिराला ३ ते ४ लाखांचा खर्च आला होता. यंदा तो १० लाखांच्या पुढे जाईल. मात्र, जायंट्स ग्रुप लोकसहभागातून गरजूंसाठी हे शिबिर करत राहील, अशी माहिती अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. रवींद्र झंवर यांनी दिली. जायंट्सचे संचालक विष्णू राऊतही होते.

शिबिरात सहभागी होण्यासाठी ९ सप्टेंबरपर्यंत नावनोंदणी करावी. सीमंत मंगल कार्यालयात ११ सप्टेंबरला तपासणी होईल. नंतर गरजूंना पाय बसवले जातील. डॉ. झंवर म्हणाले, गँगरीनमुळे ७० टक्के जणांना पाय गमवावे लागतात. २५ टक्के महिला आणि ५ टक्के अपघातात पाय गमावलेले लोक येतात. यातील ९० टक्के लोक ग्रामीण भागातील आहेत. ७५ टक्के जणांचे वय ४० वर्षांहून अधिक आहे. आजवर ६ हजारांहून अधिकांना जयपूर फूट दिला आहे.नरेंद्र पटेल म्हणाले, फूटचे आयुष्य ३ वर्षांचे असते. शिबिरात नव्या लोकांसह पुनर्तपासणी, रिपेअरिंगसाठीही लोक येतात. आम्ही अॅल्युमिनियम फूट वापरतो, त्याचे लाईफ जास्त असते.

हे शिबिर हीच माझी सत्यनारायण पूजा
डॉ. झंवर म्हणाले, माझ्या रुग्णालयाचे उद्घाटनच या शिबिराने १९८५ मध्ये करण्यात आले होतेे.रुग्णालयाची सुरुवात करण्यासाठी मी इतर पूजाविधी केला नाही. कारण रुग्णांचे आयुष्य बदलून टाकणारा हा उपक्रमच माझी पूजा, सत्यनारायण आहे असे मी मानतो.

बातम्या आणखी आहेत...