आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:शेजारणीसोबत झालेल्या किरकोळ भांडणातून महिलेने आधी दोन चिमुकल्यांना गच्चीवरुन खाली फेकले, नंतर स्वतः मारली उडी

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच ठिकाणी उभे राहून महिनेने अगोदर दोघा चिमुकल्याxना खाली फेकले नंतर स्वतः उडी मारली - Divya Marathi
याच ठिकाणी उभे राहून महिनेने अगोदर दोघा चिमुकल्याxना खाली फेकले नंतर स्वतः उडी मारली
  • महिला आणि तीन वर्षीय मुलगी गंभीर जखमी, तर 14 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

शेजारणीसोबत झालेल्या किरकोळ भांडणामुळे तिला अद्दल घडवण्यासाठी चौदा महिन्यांचा मुलगा आणि तीन वर्षीय मुलीसह महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज औरंगाबादमधील बजाजनगर येथील जिजामाता हौसिंग सोसायटीत दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत महिला व तीन वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली, तर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी वाढदिवस साजरा केलेला चिमुकला जागीच ठार झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मूळ सोलापूर जिल्ह्यातील बारलोणी गावातील सतीश नागनाथ आतकर (27) हे कुटुंबियांसह वाळुजमध्ये कामानिमित्त येऊन स्थायिक झाले होते. वडगाव गट नंबरमधील एका एजन्सीवर काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मागील काही दिवसांपासून आरएक्स-12 जिजामाता कॉलोनी येथील गायकवाड यांच्या घरात ते भाड्याने खोली घेऊन राहत होते. त्यांच्या शेजारी इतरही भाडेकरू राहतात.

घटनेच्या दिवशी शेजारील महिलेसोबत लहान मुलांच्या कारणावरून किरकोळ वाद झाल्याने महिलेने शेजारणीला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने अवघ्या 14 महिने वयाच्या सोहमला गच्चीवरून खाली फेकले लगेच तीन वर्षीय प्रतीक्षाला सुद्धा वरून खाली फेकले त्यानंतर स्वतः सुद्धा उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात अनिता आतकर (23) यांच्या डोक्याला व दोन्ही पायाला तर प्रतीक्षाच्या पायांना गंभीर दुखापत होऊन ती जखमी झाली. तर सोहमच्या डोक्याला मार लागल्याने त्याला उलटी होऊन अवघ्या काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अभिजित गायकवाड, मनोज जैन, रवी शर्मा आदींनी रुग्ण वाहिकेने महिलेला घाटीत उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन अधिक महिती घेतली.

बातम्या आणखी आहेत...