आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात मला कोठेही दंगली घडवायच्या नाही, तशी माझी इच्छाही नाही; पण मशिदीवरील भोंगे 4 मेपर्यंत उतरायलाच हवे. अन्यथा मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा वाजवू विनंती करूनही समजत नसतील तर होऊन जाऊ द्या! अशी चिथावणीही राज ठाकरे यांनी दिली.
लाऊड स्पिकर हा सामाजिक विषय आहे, तो धार्मिक विषय नाही. पण तुम्ही याला धार्मिक वळण देत असाल त आम्हीही त्याचे उत्तर धर्मानेच देऊ असा घणाघात राज ठाकरे यांनी केला.
औरंगाबादच्या ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज सायंकाळी 8 वाजता राज ठाकरे यांची सभा झाली त्यावेळी ते बोलत होते. सभेला संबोधन करण्यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला.
ठाकरे म्हणाले, टोकाची भूमिका घ्यायची आमची इच्छा नाही, उत्तर प्रदेशात लाऊड स्पिकर उतरवले जात असतील तर महाराष्ट्रात का नाही असा सवाल करून सर्वच्या सर्व भोंगे अनाधिकृत असल्याचे ते म्हणाले.
मला ईद सणात विष कालवायचे नाही
आज 1 मे आहे, 3 मे रोजी ईद आहे, मुस्लिम धर्मियांच्या सणामध्ये मला विष कालवायचे नाही म्हणून 3 ऐवजी 4 मे पासून आम्ही ऐकणार नाही. या तारखेनंतर जे लाऊडस्पिकर लागतील त्यांच्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा वाजवायलाच हवा असे म्हणत त्यांनी आम्ही विनंती करूनही जर समजत नसेल तर आमच्याकडे पर्याय नाही. 4 मे पासून लाऊडस्पीकर लागायला नको अन्यथा दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा मशिदीसमोर लावा, समजत नसतील तर होऊन जाऊ द्या! अशी चिथावणीही राज ठाकरे यांनी दिली.
यांना हा अधिकार कुणी दिला
पोलिसांना विनंती की, सभेच्या वेळी जर हे बांग सुरू करीत असतील तर आत्ताच्या आत्ता त्यांच्या तोंडात बोळा कोंबावा त्यानंतरही समजत नसेल तर मला माहित नाही. सरळ भाषेत समजत नसतील तर एकदा काय ते होऊनच जाऊदे असे म्हणत मनसैनिकांनी अजिबात शांत बसता कामा नये असेही राज ठाकरे यांनी इशारा दिला.
भोंग्यानंतर मोर्चा रस्त्यावरील नमाज पठणाकडे
अजान थांबवा माझ्या सभेवेळी आवाज नको असे म्हणत राज यांनी रस्त्यावर नमाज पठण करण्याचा अधिकार यांना कुणी दिला असा सवालही राज ठाकरे यांनी केला. लाऊड स्पिकर लाऊन गोंगाट करणार असेल तर आम्हीही मशिदीसमोर लाऊड स्पिकर लावू असेही राज ठाकरे म्हणाले.
ब्राम्हण असल्याने पुरंदरेंना पवारांनी त्रास दिला
महाराष्ट्राच्या घराघरात शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज पोहचवले; त्या पुरंदरेंना शरद पवार वृद्धापकाळात त्रास देत होते, ते ब्राम्हण होते म्हणून त्यांना त्रास दिला जात होता असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
शरद पवार जाती-जातीत विष कालवतात
राज ठाकरे दोन समजात दुही माजवतात या शरद पवारांच्या विधानाचा समाचार घेताना राज म्हणाले की, मी दोन समाजात दुही माजवतो असे पवार म्हणतात; पण पवार स्वतःच जाती-जातीत विष कालवतात अशी जहरी टीका करून हातात पुस्तक घेतले की लेखक कोणत्या जातीचा आहे हे शरद पवार बघतात असेही ते म्हणाले.
रामदास स्वामींसंदर्भात पवारांनी राजकारण केले
रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत असे कुणाही म्हटले नाही, पण शरद पवार आणि राष्ट्रवादीने या विषयाचे राजकारण केले. शिवाजी महाराजांवर रामदासांऐवढे कुणीही एवढे दर्जेदार लिहिले नाही असेही राज ठाकरे म्हणाले.
शरद पवारांना हिंदु शब्दाची अॅलर्जी
ज्या दिवसापासून मी शरद पवार नास्तिक असल्याचे सांगितले, तेव्हापासून पवार त्यांचा फोटो देवासोबत लावत आहेत. समाजवादाचा विचार याच महाराष्ट्रातून गेला, राष्ट्रवादाचा विचार याच महाराष्ट्रातून गेला आणि हिंदुत्वाचा विचारही याच महाराष्ट्रातून गेला. पवारांनी आपली नौटंकी थांबवावी ते ध्रुवीकरणाचे राजकारण करतात. मी जात मानत नाही हे पवारांनी समजून घ्यावे. तुम्हाला 'हिंदू' या शब्दाची अॅलर्जी आहे. जातीच्या वर उठून आपण मराठी कधी होणार, हिंदू कधी होणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शाहू फुलेंचा महाराष्ट्र असे पवार म्हणतात; पण त्यांच्या तोंडी कधीही शिवाजी महाराजांचे नाव ऐकले नव्हते. त्यांच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांचा फोटोही नव्हता. पण मी यावर बोललो तेव्हा शरद पवारांनी शिवाजी महाराजांचे नाव घ्यायला सुरुवात केली असेही राज ठाकरे म्हणाले.
सुप्रियाच लोकसभेत म्हणाल्या पवार नास्तिक
मी शरद पवारांना नास्तिक म्हटले तर त्यांना झोंबले त्यावर शरद पवार मला म्हणतात की, राज यांनी त्यांच्या आजोबाचे पुस्तक वाचावे. मी माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचली आहेत. मी वाचलेले पुस्तक व्यक्तीसापेक्ष आहे पवारांसारखे जाती-जातीत भांडणे लावणारे नव्हते असा घणाघात करीत ठाकरे यांनी आजोबा भटभिक्षुकीच्या विरोधात होते पण ते धर्म माननारे होते अशी आठवणही शरद पवार यांना त्यांनी करून दिली.
शिवाजी व्यक्ती नव्हे विचार हे औरंगजेबालाही कळले होते
शिवाजी महाराजांच्या मृ्त्यूनंतर औरंगजेब महाराष्ट्रात 27 वर्षे आला आणि येथेच त्याचा मृत्यू झाला. औरंगाबजेबाने लिहिलेली पत्र पाहिल्यास त्यात नमुद आहे की मला शिवाजी अजूनही छळतोय अर्थात औरंगजेबाला कळले होते की, शिवाजी व्यक्ती नाही तर एक विचार आहे असेही ठाकरे म्हणाले.
औरंगाबादचे मुळ नाव खडकी, एक पैठण आणि दुसरा देवगिरी किल्ला या दोन्ही राजधानीही याच जिल्ह्यातील आहेत पण जो समाज इतिहास विसरला त्याच्या पायाखालची जमीन सटकली. ज्ञानेश्वर गेल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी येथे आला आणि देवगिरीत शिरला होता.
अलाउद्दीन खिलजी इथे आला तेव्हा त्याच्यासोबत काही हजार लोक होते, पण लाखो सैनिक त्याच्यासोबत येत असल्याची खोटी बातमी महाराष्ट्रात पसरवली गेली. खिलजीच्या काळात बलात्कार झाले, मंदिरे पाडली गेली, मग 1630 मध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. स्वाभिमानाने कसे जगायचे हे आमच्या राजाने (छत्रपतींनी) शिकवले असेही ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राची काय अवस्था झाली?
आमच्या विचारातृ शिवाजी यायला हवे, हाच आमचा महाराष्ट्र आहे, पण महापूरूषांचे विचार रुजवण्यासाठी फक्त त्यांच्या जयंत्याच साजऱ्या केल्या जात आहे. आज राजकारणाची अवस्था काय झाली? महाराष्ट्राने देशाला विचार दिला त्याच राज्यातील नेत्यांमुळे आज महाराष्ट्राची अब्रु जात आहे. महाराष्ट्र रोज खड्ड्यात जात आहे आणि आपण महाराष्ट्र दिन साजरा करीत आहोत. या दिवसातून आपण काहीच प्रेरणा घेत नाही. आई -बहिणीवरून शिव्या घातल्या जात आहेत. आपण सर्वांना फक्त हुल्लडबाजी शिकवत आहोत असेही राज म्हणाले.
माझ्या सभेच्या परवानगीवरून एवढा गोंधळ कशासाठी?
''माझ्या सभेला परवानगी मिळणार कि नाही मिळणार ही गोष्ट का केली हे मला अजूनही समजली नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यात सभा घेतली असती तरीही तुम्ही पाहिलेच असते. मुंबईला सभा घेतली त्यानंतर सगळेच जण सभा घेतली. त्यानंतर अनेक जण बडबडायला लागले. खरे तर मी दोनच सभा घेतल्या या सभांवर किती बोलले गेले'' असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र पिंजून काढणार
ठाण्याच्या सभेनंतर औरंगाबादेत सभा घेत आहोत म्हणजे यानंतरच्या सभाही मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात होणार आहेत. कोकण, विदर्भ, प. महाराष्ट्रातही मी सभा घेणार आहे. सभांना आडकाठी आणून काहीच होणार नाही. कोंबडा झाकायचे ठरवले तरीही सुर्य उगवतोच असेही राज ठाकरे म्हणाले. राज्यात अनेक प्रश्न आहे.
शहरात पाणी प्रश्न आहेच पण इतिहास विसरता कामा नये
औरंगाबादेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. सर्वच प्रश्न प्रलंबित आहे मला याची संपुर्ण कल्पना आहे पण आपण आपला इतिहास विसरता कामा नये इतिहास विसरलो की भूगोल नाहीसा होतो असेही राज ठाकरे म्हणाले.
भाषणापुर्वी शाहिर साबळे यांचे नातू आणि चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांना व्यासपीठावर बोलावून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान देणारे शाहीर साबळे यांच्यावरील चित्रफीत सभास्थळी दाखविण्यात आली.
तत्पुर्वी राज ठाकरे शनिवारीच शहरात दाखल झाले. त्यानंतर आता राज्यभरातील मनसेचे हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते व मनसेप्रेमी मैदानावर दाखल झालेत. त्यांचे जत्थेच्या जत्थे या मैदानाकडे आले आहेत. सभास्थळी राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे पोहचले आहेत.
शिवसेना कशी संपवायची हे संजय राऊत यांच्या कडून शिकावे- सरदेसाई
राज ठाकरेंची भूमिका बदलली नाही तर शिवसेनेचीच भूमिका बदलली आहे. हे सत्तेमुळे घडले त्यावरच पीएचडी आणि संशोधनाची गरज आहे असे मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले.
स्वतःचा पक्ष कसा संपवायचा हे संजय राऊत यांच्या कडून शिकावं, राष्ट्रवादीला कसे मोठं करायचं हे त्यांना माहिती आहे अशी टीका करीत ते म्हणाले की, मला एकच सांगायचे की, शिवसेनेच्या रक्तात हिंदुत्व असेल तर आता मला वाटते की, शिवसेनेने रक्तगटच बदलला आहे असेही सरदेसाई म्हणाले.
राज ठाकरे नावाची जादू काय हे देशाला कळले - प्रकाश महाजन
मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले, ''राज ठाकरे नावाची जादू काय हे देशाला कळले आहे. मैदानही आता कमी पडले आहे. राज ठाकरे यांच्याच काय तर त्यांच्या मुलाच्याही हाताखाली आम्ही काम करु. हनुमान चालिसा म्हणायला दोन जण आले; तेव्हा उद्धव ठाकरे पळून गेले, घराचे रक्षण कोण करणार? अशी परिस्थिती उद्धव यांची झाली.
माझ्या नेत्यावर खालच्या पातळीवर टीका केली तर येणाऱ्या सभेत तुमचा शिमगा करू असेही महाजन म्हणाले. अजाण होते त्याचा अर्थ काय तर अल्लाशिवाय जगात कोणीच मोठे नाही त्यांची प्रार्थना करा आम्ही कशाला करावी असेही ते म्हणाले. रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांच्या वाढदिवशी स्पिकर वाजवला तर काही लोक आणि पोलिस शिरले, आम्ही हिंदु आहोत आम्हालाही सणवार नाही का असा सवालही त्यांनी केला.
शिवसेना औरंगाबादचा पाणीप्रश्न सोडवू शकली नाही - सुमीत खांबेकर
''औरंगाबादचा पाणीप्रश्न अजून सुटलेला नाही. 1650 कोटी रुपयांची पाणी योजना आणली पण अजूनही पाणीप्रश्न सुटलेला नाही. उशाला जायकवाडी धरण असतानाही पाणी औरंगाबादेत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. शहरात पार्किंगची सोय नाही साधे प्रश्न शिवसेना सोडवु शकली नाही'' अशा घणाघात मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी केला. औरंगाबादची जबाबदारी राज ठाकरे यांनी स्विकारली असून शिवसेना सत्तेत असतानाही त्यांना गत पाच वर्षांत उद्योग आणता आले नाही असेही खांबेकर म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरुन सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामुळे राज ठाकरे आजच्या सभेद्वारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विशेषतः हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.