आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णाभाऊ साठेंचे साहित्य समाज परिवर्तनाचा ध्यास:विद्यापीठातील व्याख्यानात डॉ. दुडुकनाळे राजेश्वर यांचे मत

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म महाराष्ट्राच्या इतिहासातील क्रांतीकारी घटना आहे. कारण त्यांनी साहित्यिक, इतिहासकार, कार्यकर्ता, अभिनेता, पत्रकार महणून यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्वाचे आहे. त्यांचे साहित्य म्हणजे, परिवर्तनाचा ध्यास आहे. असे मत, देगलुर येथील डॉ. दुडुकनाळे राजेश्वर यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शाहिर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्रातर्फे सोमवारी (1 ऑगस्ट) साठे जयंतीनिमित्त महात्मा फुले सभागृहात त्यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते.

अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील परिवर्तनवाद’ या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘अण्णाभाऊ साठे यांचा जन्म महाराष्ट्राच्या इतिहासातील क्रांतीकारी घटना आहे. साहित्यिक, इतिहासकार, कार्यकर्ता, अभिनेता, पत्रकार महणून त्यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. समाज परिवर्तनाच्या लढयासाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही प्रेरणादायी आहे. मार्क्स, मॅक्झीम गॉर्की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्थानी मानून त्यांनी कार्य केले.

भारतीय समाजाला दिशादर्शक ठरेल ऐवढे विपूल साहित्य त्यांनी निर्माण केले. अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू म्हणाले, ‘महापुरुषांचे विचार सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी या सर्व अध्यासनाची निर्मिती झाली आहे. खऱ्या अर्थाने महापुरुष व्यक्ती नसुन विचार असतात त्यांना त्या पध्दतीनेच समजून घेतले पाहिजे.

अण्णाभाऊंनी आयूष्यात कुठलीही परीक्षा दिली नाही, परंतू जीवन जगताना प्रत्येक दिवस परीक्षेसमान जगले, अण्णाभाऊंच्या साहित्यातील प्रत्येक नायक कुठल्या जाती, धर्म, पंथाचे नसुन तो शोषकांचे प्रतिनिधित्व करतो हे लक्षात घेतले पाहिजे. अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. संजय सांभाळकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. मंजुश्री लांडगे यांनी केले. आभार डॉ. सुर्यकांत सांभाळकर यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...