आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये दरेकरांचा ताफा अडवला:औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेंच्या समर्थकांची डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी

औरंगाबाद / बीड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांच्या नाराजीचा उद्रेक रविवारी झाला. औरंगाबादमध्ये दोन समर्थकांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नूतन कॉलनीतील कार्यालयासमोर सायंकाळी घोषणा दिल्या. कराड समर्थकांनी त्यांना चोप दिला. त्याआधी बीड जिल्ह्यात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा दोन वेळा अडवण्याचा प्रयत्न झाला.

औरंगाबादमध्ये पंकजा मुंडेंच्या दोन समर्थकांना डॉ. भागवत कराड यांच्या समर्थकांनी चोप दिला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले.

बीड जिल्ह्यातील चौसाळ्याजवळ पंकजा समर्थक प्रदीप बांगर यांच्यासह १५-२० कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकर यांचा ताफा दोनदा अडवला.

पंकजाताई, कार्यकर्त्यांना आवरा : चंद्रकांत पाटील
भागवत कराडांच्या कार्यालयावर चाल करून जाणारे आणि प्रविण दरेकर यांचा ताफा अडवणारे जर पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्या आगामी कारकीर्दीला यामुळे फटका बसू शकतो.त्यांनी समर्थकांना आवरावे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...