आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टॉवर स्टंट:मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी टॉवर वर चढून उपोषण, टॉवरवरूनच व्हिडिओ केला जारी; औरंगाबादेतील पैठण तालुक्यातील प्रकार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवावी आणि नोकर भरती स्थगिती करण्याची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली स्थगिती उठवावी आणि मराठ आरक्षणासंदर्भात लवकर निर्णय घ्यावा या मागणीसाठी तरुणाकडून शोले स्टाइल उपोषण करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड येथील छावा क्रांतिवीर सेनाचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत भुमरे आज सकाळी 9 वाजता पाचोड येथील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत आहे. दरम्यान स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून युवकाने खाली उतरावे यासाठी प्रयत्न करत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण स्थगिती दिली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवावी तसेच हा प्रश्न सुटेपर्यंत सर्व विभागाच्या नोकरभरतीला स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी आज सकाळी 9 वाजेपासून मोबाईल टॉवरवर बसून आमरण उपोषण सुरू केले आहे. भुमरे यांनी टॉवरवरूनच व्हिडिओ जारी करत जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी खबरादारीचा उपाय म्हणून पाचोड पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser