आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:स्वत:च्या मुलीवर दोनदा बलात्कार करणाऱ्या नराधम पित्यास जन्मठेप

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीडिता, मुख्याध्यापक आणि फिर्यादीचा जबाब महत्त्वाचा ठरला

स्वत:च्या नऊ वर्षांच्या मुलीला नवीन चप्पल खरेदी करण्याच्या बहाण्याने घरातून नेत तिच्यावर एका दिवसात दोनदा बलात्कार करणाऱ्या ३५ वर्षीय नराधम पित्याला जन्मठेप आणि विविध कलमांखाली ५८ हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी सुनावली. विशेष म्हणजे दंडापैकी २० हजारांची रक्कम पीडितेला देण्याचे म्हटले आहे. याप्रकरणात पीडितेच्या २८ वर्षीय आईने फिर्याद दिली. गुन्हा घडतेवेळी पीडिता तिसरीत शिक्षण घेत होती. पीडितेचा पिता हा दारुड्या होता. ९ मार्च २०१७ सायंकाळी पाच वाजात आरोपीने पीडितेला नवीन चप्पल घेऊन देतो असे फिर्यादीला सांगून पीडितेला सायकलवर बसवून देवगाव रंगारीला घेऊन गेला. परंतु, त्या रात्री आरोपी व पीडिता घरी आले नाही.

दुसऱ्या दिवशी पीडितेला घरासमोर सोडून आरोपी पसार झाला. फिर्यादी पीडितेला अंघोळीसाठी घेऊन गेली असता तिच्या पाठीवर मारहाणीचे व्रण दिसल्याने फिर्यादीने चौकशी केली. तेव्हा पीडितेने सांगितले की, आरोपी हा पीडितेला देवगाव रंगारी येथे घेऊन गेला, त्यानंतर त्याने चिकन घेतले व तेथून देवळाना रोडवरील एका शेतात पीडितेला घेऊन गेला. तेथे आरोपीने पीडितेच्या शरीराशी अश्लील चाळे केले. पीडितेने विरोध केला असता तिला बेदम मारहाण केली. रात्री आरोपीने ओळखीच्या महिलेकडून चिकनची भाजी करून घेतली. त्यानंतर पीडितेला रात्री शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पीडिता, मुख्याध्यापक आणि फिर्यादीचा जबाब महत्त्वाचा ठरला
तपास अधिकारी तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक आर. जे. आडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागूल आणि ज्ञानेश्वरी नागुला-डोली यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात पीडिता, फिर्यादी आणि मुख्याध्यापकाचा जबाब महत्त्वाचा ठरला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने नराधम पित्याला दोषी ठरवून भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली जन्मठेप आणि ५८ हजारांच्या दंडाची शिक्षा केली.बातम्या आणखी आहेत...