आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:औरंगाबादेत एका दिवसात प्रथमच 1 हजार 23 नवीन काेराेनाबाधित, 11 जणांचा मृत्यू

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठवाड्यात नवे २ हजार ४६७ रुग्ण,११ जणांचा मृत्यू

मराठवाड्यात रविवारी २४६७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून ११ जणांचा मृत्यू झाला. रविवारी औरंगाबादमध्ये सर्वाधिक १०२३, जालना ३०८, परभणी ८७, हिंगोली ४४, नांदेड ५६६, लातूर ११०, उस्मानाबाद ६९, बीडमध्ये २६० कोरोनाबाधित आढळले. औरंगाबाद ५, नांदेडमध्ये २, जालना, परभणी, लातूर, बीडमध्ये प्रत्येकी एका काेरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

औरंगाबादेत गतवर्षी १५ मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला हजारावर नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनासमोर चिंता वाढली आहे.

मराठवाड्यात १२९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ११ हजार ६२२ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

विदर्भात ४ हजार ९९३ नवे बाधित : विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये रविवारी कोरोनाचे ४,९९३ नवे रुग्ण आढळले, तर ३७ बाधितांचा मृत्यू झाला. रविवारी ३,११२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मृतांमध्ये पूर्व विदर्भात नागपूर १२, वर्धा ६, तर भंडारा जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. पश्चिम विदर्भात अमरावती ६, यवतमाळ ५, बुलडाणा ४, अकोला २, तर वाशीम जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...