आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना रविवारी बीड दौऱ्यावर असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने नाराज समर्थकांनी दरेकर यांचा ताफा २ वेळा अडवण्याचा प्रयत्न केला.
त्याचबरोबर रविवारी रात्री ७.३० वाजता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या औरंगाबादेतील नूतन कॉलनीतील कार्यालयासमोर २ मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. या वेळी मुंडे समर्थक आणि डॉ. कराड समर्थक यांच्यात चांगलीच जुंपली. कराड समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी मुंडे समर्थकांना याप्रसंगी चांगलाच चोप दिला. घटनास्थळी पोलिसांची कुमक आल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले.
भाजपतील अंतर्गत गटबाजीमुळे पंकजांवर अन्याय होत असल्याची समर्थकांची भावना आहे. दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी पंकजा समर्थकांकडून जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे.
भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र
दोघे पदाधिकारी हे मानसिकदृष्ट्या विकलांग आहेत. कुणीही टिनपाट कार्यकर्ते उठतात व घोषणाबाजी करतात. ते पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. भाजपची बदनामी करण्यासाठी षडयंत्र आखले जात असल्याचे भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी सांगितले. संबंधित पंकजा समर्थक असल्याचे सांगून पक्षाचे नाव बदनाम करीत आहेत. या दोघांनी केणेकर यांना ठार मारू अशी धमकी दिल्याचेही केणेकर यांनी याप्रसंगी सांगितले. आपणास पोलिस संरक्षण मिळावे यासाठी पोलिस आयुक्तांकडे रीतसर निवेदन देणार असल्याचेही केणेकर म्हणाले.
पंकजाताई, कार्यकर्त्यांना आवरा : चंद्रकांत पाटील
भागवत कराडांच्या कार्यालयावर चाल करून जाणारे आणि प्रविण दरेकर यांचा ताफा अडवणारे जर पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्या आगामी कारकीर्दीला यामुळे फटका बसू शकतो.त्यांनी समर्थकांना आवरावे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.