आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुडून मृत्यू:बदनापूर-गेवराई तालुक्यांत 3 भावंडांसह 6 जणांचा बुडून मृत्यू

बदनापूर/गेवराईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दैठण येथे शेततळ्यात पिता-पुत्रासह भाचा बुडाला

शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बदनापूर तालुक्यातील कुसळी भागातील बैलभरा शिवारात गुरुवारी दुपारी ४च्या सुमारास घडली. मनोज अंकुश वैद्य (११), दीपाली अंकुश वैद्य (१०), आकाश संजय वैद्य (७) अशी मृत भावंडांची नावे आहेत.

बैलभरा शिवारातील गायरान जमिनीवर तयार केलेल्या तलावानजीक अंकुश वैद्य यांची शेती आहे. ते कुटुंबासह शेतात कामाला गेले होते. दरम्यान, शेळ्या चारत असताना तिन्ही भावंडे पाझर तलाव परिसरात गेली. मनोज वैद्य हा पाझर तलावात बुडू लागल्याने दीपाली पाण्यात उतरली. हे दोघेही दिसत नसल्यामुळे आकाशही पाण्यात उतरला. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. तिघे जण बुडाल्याचे लक्षात येताच तेथे थांबलेल्या चौथ्या मुलाने पालकांकडे धाव घेतली. यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी तलावात उतरून तिघांचे मृतदेह बाहेर काढले.

दैठण येथे शेततळ्यात पिता-पुत्रासह भाचा बुडाला
शेततळ्यात पोहायला गेलेला मुलगा व भाचा बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील दैठण येथे गुरुवारी सायंकाळी घडली. सुनील जगन्नाथ पंडित (४०) गुरुवारी सायंकाळी सहादरम्यान मुलगा राज (१२) व भाचा आदित्य पाटील (१०, रा. शेवगाव जि. नगर) यांच्यासोबत शेततलावात पोहण्यासाठी गेले होते. राज व आदित्य हे शेततलावात पोहत असताना ते बुडू लागले. या वेळी सुनील यांनी शेततळ्यात उडी घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघांचाही बुडून मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...