आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:बरडा शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या मजूराचा शोध सुरू, मुलाच्या डोळ्या देखील वडील पुरात गेले वाहून

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील बरडा शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात एक मजूर वाहून गेल्याची घटना घडली असून मागील वीस तासापासून त्यांचा शोध सुरु आहे. मंगळवारी ता. 7 दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांचा शोध लागला नाही. उध्दव श्रीरंग काळे (35) असे वाहून गेलेल्या तरुण मजूराचे नांव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरडा येथे उध्दव काळे हे त्यांची पत्नी व तीन मुलांसह राहतात. उदरनिर्वाहासाठी शेती नसल्याने मिळेल ते काम करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

सोमवारी ता. 6 दुपारी चार वाजता उध्दव हे त्यांच्या मुलगा सुभाष काळे याच्या सोबत गावाजवळून वाहनाऱ्या पूर्णा नदीच्या पात्राकडे आले होते. पूर्णा नदीच्या लाभ क्षेत्रात मागील दोन ते तीन दिवसांपासून मोठा पाऊस होत असल्याने नदीला पुर आला असून नदीचे पात्र दुथडीभरून वाहू लागले आहे. या पुराच्या पाण्यात उध्दव काळे पुलावरून पडले अन मुलगा सुभाष याला काही कळण्याच्या आत ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागले. दरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सुभाष याने आरडा ओरड केली. त्यानंतर परिसरातील गावकरी मदतीसाठी धावले.

मात्र तो पर्यंत उध्दव काळे दिसेनासे झाले. या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित भोईटे, जमादार महादू शिंदे, शिवदर्शन खांडेकर, तलाठी भालेराव, सरपंच परमेश्‍वर सानप यांच्या सह गावकरी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस व गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरु केला. मात्र आज दुपारी एकवाजेपर्यंत त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी अकोला व परभणी येथील पथकाला पाचारण केले आहे.

बातम्या आणखी आहेत...