आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • In Class 10th 12th Examination, The Facilities And Exemptions Provided During The Corona Period Will Be Canceled As Usual Written And Practical Examination.

10 वी,12वीच्या परीक्षेत कोरोना काळातील सुविधा, सुट रद्द:लेखी, प्रात्याक्षिक परीक्षा नेहमीसारखीच - बोर्डातील अधिकाऱ्यांची माहिती

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहावी-बारावीच्या परीक्षेत कोरोनामुळे 2021-2022 या वर्षात देण्यात आलेल्या सुविधा आणि पेपर लिहिण्यासाठी देण्यात आलेला अधिकचा वेळ 2023-2024 या वर्षाच्या परीक्षेत लागू राहणार नाही. नेहमीप्रमाणे जशा परीक्षा होतात. तशाच होतील. तसेच पेपर लिहिण्यासाठी जो वेळ वाढवून दिला होता आणि होम सेंटर देण्यात आले होते. ते आता राहणार नाही. पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल. अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली.

होमसेंटर राहणार नाही

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या परीक्षा होणार आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे काही नियमांमध्ये सुट देण्यात आली होती. तसेच बाह्य परीक्षा केंद्रा ऐवजी होम सेंटर देण्यात आले होते. परंतु येणाऱ्या परीक्षेत होम सेंटर राहणार नाही. असे विभागीय शिक्षण मंडळ तसेच राज्यमंडळाने देखील परीक्षा केंद्रात झालेल्या गैर प्रकारातील प्रकरणामुळे स्पष्ट केले होते.

अतिरिक्त अवधीची सवलत रद्द

ऐंशी गुणांच्या पेपरसाठी देण्यात आलेली अर्धातास वाढीव आणि साठ व चाळीस गुणांसाठी असलेली अधिकची पंधरा मिनिटांची सवलत या परीक्षेत विद्यार्थ्यांना राहणार नाही. मात्र नियमानुसार परीक्षेत अर्धातास अधिकचा वेळ दिव्यांग विद्यार्थ्यांना असलेली ही सुविधा कायम राहणार आहे. तसेच मागील परीक्षेत 25 टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला होता. येणाऱ्या परीक्षेत मात्र संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा असणार आहे. असे देखील विभागीय शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

अर्ज भरण्याची प्रक्रिया

सध्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. बारावीचे अर्ज भरण्यासाठी 15 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली असून, शुक्रवारी सायंकाळपर्यंत 1 लाख 48 हजार 636 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. तर दहावीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर पर्यंत असून, 95 हजार 682 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

''मागील परीक्षेच्या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि विद्यार्थी सुरक्षितता लक्षात घेता. तसेच शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव देखील कमी झाल्यामुळे होम सेंटरवर परीक्षा झाल्या नाहीत व विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी देखील वेळ वाढवून देण्यात आला होता. परंतु आता परिस्थिती सुधारलेली असून, सर्व शाळा देखील नियमित सुरळीत सुरु असल्याने देण्यात आलेल्या सुविधांची सुट रद्द करण्यात आली असून, नियमित जशा पद्धतीने आजवर परीक्षा झाली आहे. तशीच होईल. फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ज्या नियमाप्रमाणे सुविधा आहेत. त्या कायम राहितील.'' - वाय.एस.दाभाडे - सहसचिव विभागीय शिक्षण मंडळ.

बातम्या आणखी आहेत...