आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाने संशोधन पद्धतीवर एकदिवसीय कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना संख्याशास्त्रावर आधारित काॅम्प्युटर लॅबमध्ये प्रशिक्षण दिले. शिवाय डॉ. रोशन काझी, डॉ. छाया सोनार, डॉ. सय्यद अझरुद्दीन यांनी मार्गदर्शनही केले.
वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रोफेसर डॉ. वाल्मीक सरवदे यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. सय्यद अझरुद्दीन होते. भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य बी. एस. चंदनशिव यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटकीय भाषणात सरवदे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी संशोधनातील नैतिक मूल्यांकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोणत्याही देशाच्या विकासात संशोधनाचे योगदान अनन्यसाधारण असते. समाजाच्या सर्वांगीण विकासाची गती, अडथळे, परिणाम आदी गोष्टींचा अभ्यास संशोधनातून मांडला जातो.’
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. अझरुद्दीन यांनी संशोधनाच्या विविध संकल्पना सांगितल्या. त्यात विविध प्रकारचे विषय, संशोधनातील प्रश्न, उद्दिष्टे, गृहितके, सँपलची निवड, सुलेखन, त्याचे वर्गीकरण आदी बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात संख्याशास्त्र विभागाच्या डॉ. छाया सोनार यांनी संशोधन आणि सांख्यिकीशास्त्राचा संबंधांविषयी प्रशिक्षण दिले. तिसऱ्या सत्रात अलाना मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे डॉ. रोशन काझी यांनी तथ्य विश्लेषणसंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यशाळेत शंभरपेक्षा अधिक संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.