आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाधानकारक बाब:चार दिवसांत हर्सूल तलावाचे पाणी 6 फुटांनी वाढले ; तलावाची क्षमता 31 फुटांपर्यंत

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसाच्या हजेरीने हर्सूल तलावातील पाण्याची पातळी सहा फुटांनी वाढली आहे. सध्या तलावाचा पाणीसाठा २२ फूट झाला असून आठवडाभरापूर्वी १६ फुटांपर्यंतच होता. शहरासाठी जायकवाडीतून होणारा पाणीपुरवठा कमी पडतो. त्यामुळे हर्सूल तलावातून कशा प्रकारे उपसा वाढवता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पावसामुळे चार दिवसांत पाणीपुरवठा वाढला ही शहरासाठी समाधानकारक बाब आहे. सध्या हडकोतील काही भागांना याच तलावातून पाणीपुरवठा होतो आहे. तलावाची क्षमता ३१ फुटांपर्यंत आहे. पावसाळ्यातही तलावातून रोज किमान १० ते १२ एमएलडी पाणी उपसा करणे सुरू आहे. जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत पावसाळ्यात हर्सूल तलावात फारसा जलसाठा झाला नाही, त्यामुळे पाणीपातळी १६ फुटापर्यंतच होती. ती आता २२ फुटांपर्यंत वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...