आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:हिंगोली शहरात भरधाव कारची दुचाकीला धडक, एक जण जागीच ठार तर एक जखमी

हिंगोली20 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • हिंगोली शहरात अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची झालेली गर्दी

हिंगोली शहरातील इंदिरा गांधी चौकात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ता.3 सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अर्शद चाऊस (32) असे मयत तरुणाचे नांव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पेन्शनपुरा भागातील अर्शद चाऊस जाबेर चाऊस व त्यांचा मित्र दुचाकी वाहनावर (एमएच-12-1581) इंदिरा गांधी चौकातून वळण घेत होते.

यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एमएच-26-एएफ-2897) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अर्शद यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मित्र गंभीर जखमी झाला. अपघाताच्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे हिंगोली शहरातून अकोला कडे जाणारी वाहतुक काही काळ ठप्प झाली होती.

या अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक पंडीत कच्छवे, जमादार शेख शकील, वाहतुक शाखेचे जमादार वसंत चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन वाहतुक सुरळीत केली. तर तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमीला शासकिय रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातानंतर कार चालकाने कार घटनास्थळी सोडून पळ काढला. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बातम्या आणखी आहेत...