आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली शहरातील खटकाळी रेल्वे गेटजवळ रविवारी (ता. १४) दुपारी दुचाकी घसरल्याने दांम्पत्य दुचाकीवरून खाली कोसळले. या अपघातात दुचाकीवरून पडल्याने घाबरलेल्या चिमुलकीवर वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर या पोलिस काकांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.
हिंगोली शहरालगत खटकाळी रेल्वे गेटजवळ रेल्वे रुळाचे काम केले जात आहे. त्यामुळे आज सकाळी साडे आकरा वाजल्या पासून ते दुपारी चार वाजेपर्यंत हिंगोली ते कळमनुरी मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहन चालकांनी पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक दांम्पत्य दुचाकी वाहनावर हिंगोली शहरात येत होते. त्यांचे दुचाकी वाहन रेल्वे गेटजवळ येताच त्यांचे दुचाकी वाहन घसरले . यामधे तिघेही खाली पडले. यामधे चार वर्षाची चिमुकली वाहनाखाली अडकून पडली.
सदर प्रकार लक्षात येताच तेथे बंदोबस्तावर असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जमादार फुलाजी सावळे, शेषराव राठोड, आनंद मस्के, गजानन राठोड, गजानन सांगळे यांच्या पथकाने धाव घेऊन तिघांनाही उचलले. यावेळी वाहतुक पोलिसांच्या वाहनामध्ये असलेली प्रथमोपचार पेटी आणून त्या दाम्पत्यावर प्रथमोपचार केले. तर या अपघातामुळे घाबरलेल्या चिमुकलीस सहाय्यक पोलिस निरीक्षक चिंचोलकर यांनी जमीनीवर बसून तिची भिती दूर केली. त्यानंतर तिच्या पायाला व हाताला झालेल्या जखमांवर मलमपट्टी करून त्या तिघांनाही एका ॲटोतून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. सदर प्रकार पाहून उपस्थित कामगारांनी तसेच वाहन चालकांनी पोलिसांतही माणुसकी शिल्लक आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त करून चिंचोलकर यांच्या पथकाला धन्यवाद दिले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.