आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली शहरातील मोकाट जनावरांना आवर घालण्यासाठी आता जनावरांना पकडून त्यांच्या मालकावरच फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी जनावरांच्या मालकांना एक दिवसांची मुदत देण्यात आली असून सदर जनावरे तातडीने घेऊन जावीत अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जावे असा इशारा मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला आहे.
हिंगोली शहरामध्ये मागील काही दिवसांपासून मोकाट जनावरांची संख्या वाढू लागली आहे. शहरात सुमारे तीनशे पेक्षा अधिक मोकाट जनावरे आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच मध्यवर्ती चौकांमधून हि जनावरे ठाण मांडून बसत आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहरात वाहतुक ठप्प होऊन सामाजिक अंतराचे पालन होत नसल्याचे चित्र असून त्यामध्ये मोकाट जनावरांचेही कारण आहे.
त्यामुळे पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी मोकाट जनावरांना आवर घालण्यासाठी जनावरांच्या मालकांवरच फौजदारी गुुुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुख्याधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे कर्मचारी बाळू बांगर, पी. डी. शिंदे, पंडीत मस्के यांच्या पथकाने शहरात सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये ठिकठिकाणी जनावरे आढळून आली आहेत. या जनावरांच्या मालकांचा शोध घेतला जात आहे. या जनावरांच्या मालकांनी एक दिवसांत आपापली जनावरे घरी घेऊन जावीत, रविवारपासून ता. २८ शहरात मोकाट जनावरे आढळून आल्यास जनावरांच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. शिवाय आपत्ती व्यवस्थापक कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे.
पकडलेल्या जनावरांचा लिलाव करणार ः रामदास पाटील, पालिका मुख्याधिकारी हिंगोली
शहरात मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे फिरत आहेत. मुख्य रस्त्यावरच जनावरे ठाण मांडत असल्याने वाहतुकीस अडथळा होत असून वाहतुक ठप्प होत आहे. त्यामुळे वाहन चालकांची गर्दी होत आहे. त्यासाठी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोबतच पकडलेल्या जनावरांचा लिलाव केला जाणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.