आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्याला लुटल्याची दुसरी घटना:जाधववाडीत दिवसा व्यापाऱ्याला चाकू लावून मारहाण; चोरटे फरार

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

व्यापाऱ्याला बुधवारी दुपारी ३ वाजता चाकू लावून मारहाण करत लुटल्याच्या घटनेने जाधववाडीत खळबळ उडाली. दोन लुटारूंनी गल्ल्यातील एक लाख ५ हजार रोख रक्कम व हातातील ९ हिरे व सव्वा अाणि दीड तोळ्याच्या दाेन साेन्याच्या अंगठ्या व चार तोळे वजनाचे ब्रेसलेट हिसकावून पळ काढला. दहा दिवसांपूर्वीच दौलताबादेत व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून लुटारूंनी १७ लाख लुटल्याची घटना घडली होती.

राजेश लक्ष्मीदास ठक्कर (५१, रा. समर्थनगर) यांचा प्लास्टिकचे बारदानचे जाधववाडीत दालन आहे. बुधवारी दुपारी ते त्यांच्या केबिनमध्ये बसलेले होते. यादरम्यान, अचानक दोघांनी प्रवेश करत धाग्याचे बंडल द्या, अशी मागणी करत हा प्रकार केला. सिडकोचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली.

सीसीटीव्ही कॅमेरे केले बंद लुटारूंनी व रक्कम, दागिने घेतल्यानंतर ठक्कर यांचा माेबाइल घेतला. त्यानंतर दुकानातील लाइट्स बंद केले. बाहेरून केबिन बंद करून सीसीटीव्ही बंद केले. त्यानंतर मोबाइल फोडला. चोरटे तोंडाला काळा कपडा बांधून दुचाकीवर आले होते.

बातम्या आणखी आहेत...