आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:मराठवाड्यात कोरोनाचे 14 बळी, 235 नवे रुग्ण

अाैरंगाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी १४ रुग्णांचा मृत्यू झाला. तर नवीन २३५ रुग्णांची भर पडली. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात २०० रुग्ण वाढले असून उर्वरित ३५ रुग्ण मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढण्याची आजवरची ही पहिलीच वेळ आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांत औरंगाबाद जिल्ह्यातील १३ रुग्णांचा समावेश असून एक रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. दरम्यान, बुधवारी जालना जिल्ह्याने रुग्णसंख्येचे चौथे शतक पूर्ण केले आहे. रात्री उशिरापर्यंत जालन्यात १६ रुग्णांची भर पडली. तसेच हिंगोली जिल्ह्यात ३, परभणी ३, लातूर ३, नांदेड ५ आणि उस्मानाबाद ५ असे उर्वरित मराठवाड्यात ३५ रुग्ण वाढले आहेत.

उमरगा शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या निलंगा तालुक्यातील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर तो कोेरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्याची संख्या आता नऊवर गेली आहे. तर बुधवारी जिल्ह्यात नवीन ५ रुग्णही आढळून आले आहेत. निलंगा तालुक्यातील औंढा येथील व्यक्ती हैदराबाद येथे ऑटोरिक्षा चालवत होती. तो पाच जूनला गावाकडे आला. १४ जूनला मुलीचे छोटेखानी लग्न आटोपल्यानंतर आजारी असल्याने कासारशिर्सी येथे प्राथमिक उपचारानंतर मंगळवारी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला न्यूमोनियाचे निदान झाले. तरी तो बाहेरून आल्याने कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याचे स्वॅब तपासणीस पाठवले होते. बुधवारी सकाळी त्याला रुग्णवाहिकेमधून पुढील उपचारासाठी लातूरला नेत असताना सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला.

जालन्यात डॉक्टरसह १४ बाधित
जालना जिल्ह्यातील १४ जणांचा अहवाल बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आला असून बाधितांची संख्या ३९८ झाली आहे. नवीन रुग्णांत सिव्हिल हॉस्पिटलमधील एका डॉक्टरचा समावेश आहे. नवीन रुग्णांत कादराबाद भागातील दोन, मंगळबाजार ३, एसआरपीएफ १, नाथबाबा गल्ली ३, मोदीखाना १, भोकरदनमधील नूतन कॉलनी २ तर अंबड तालुक्यातील गोंदी येथील २ रुग्णांचा समावेश आहे.

निलंगा तालुक्यातील औंढा येथील व्यक्ती हैदराबाद येथे ऑटोरिक्षा चालवत होती. तो पाच जूनला गावाकडे आला. १४ जूनला मुलीचे छोटेखानी लग्न आटोपल्यानंतर आजारी असल्याने कासारशिर्सी येथे प्राथमिक उपचारानंतर मंगळवारी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला न्यूमोनियाचे निदान झाले. तरी तो बाहेरून आल्याने कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याचे स्वॅब तपासणीस पाठवले होते. बुधवारी सकाळी त्याला रुग्णवाहिकेमधून पुढील उपचारासाठी लातूरला नेत असताना सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला.

बुधवारी हिंगोली जिल्ह्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर लातूर येथे आणखी तीन नवीन रुग्ण अाढळले आहेत. परभणी जिल्ह्यात काेराेनाचे ३ रुग्ण वाढले असून रुग्ण संख्येने शंभरी पार केली. त्यामुळे जिल्हा महसूल प्रशासनाने बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शनिवारी(दि.२७) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...