आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटत्या चाचण्यांमुळे रुग्णसंख्येचा आलेख खाली:धोकादायक मराठवाड्यात लॉकडाऊनपूर्वी रोज ३४ हजार चाचण्या, आता आकडा २५ हजारांवर

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लातूर : पॉझिटिव्हिटी दर ३३ वरून २३ टक्क्यांवर

मराठवाड्यात काेराेना रुग्ण घटत असल्याचे आकड्यांत दिसत अाहे. १२ एप्रिल राेजी मराठवाड्यात ८,३५० रुग्ण हाेते. ३ मेपर्यंत ही संख्या ६,२४९ पर्यंत खाली आली.

लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या घटल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्येत घट झाली आहे. विभागात १२ एप्रिलला ३४ हजार चाचण्या केल्या जात होत्या. २ मेपर्यंत चाचण्यांची संख्या घटत २५ हजार ५६९ इतकी खाली आली. विशेष म्हणजे १२ एप्रिलला मराठवाड्याचा पॉझिटिव्हिटी दर २४.५४ टक्के होता. चाचण्या कमी केल्यानंतरही तो दर २४.४७ पर्यंत स्थिर राहिला.

१५ एप्रिलनंतर राज्यासह मराठवाड्यात लॉकडाऊन लागला. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होईल, अशी आशा असताना मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येला ब्रेक लागेल असे चित्र झालेच नाही. याउलट प्रशासनाने चाचण्या कमी केल्या आहेत.

लातूर : पॉझिटिव्हिटी दर ३३ वरून २३ टक्क्यांवर
लातूर जिल्ह्याने चाचण्यांत सातत्य कायम ठेवले. जिल्ह्यात १२ एप्रिल रोजी ५७७९ चाचण्या झाल्या. १,९१६ रुग्ण आढळले, तर पॉझिटिव्हिटी रेट ३३.१५ टक्के इतका होता. त्यानंतर १४ रोजी ५,०६५, १५ रोजी ५,६६१ तर १६ एप्रिलला ५,३६१ तर १७ रोजी ६,४२६ व १८ एप्रिलला ४,५२९ चाचण्या झाल्या. २० एप्रिल रेाजी ५३१२ चाचण्या करण्यात आल्या. २७ एप्रिल रोजी ४,८६७ तसेच ३० एप्रिल ५,१०५ चाचण्या केल्या. यात ११२६ रुग्ण आढळले. २५.२७ इतका पॉझिटिव्हिटी दर होता. १ मे रेाजी ४,०५५ चाचण्या केल्यानंतर १,१२६ रुग्ण आढळले. पॉझिटिव्हिटी दर २७.७७ इतका होता. २ मे रोजी ५,३०४ चाचण्या व ३ मे रोजी ५,०९२ चाचण्या झाल्या. यात १,२१७ रुग्ण आढळले. २३.९० पॉझिटिव्हिटी दर आहे. लातूरने चाचण्यांत सातत्य ठेवल्यामुळे पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांनी कमी झाला.

औरंगाबादमध्येही कमी केल्या चाचण्या
औरंगाबादमध्ये १२ एप्रिलला ८७४४ चाचण्या झाल्या असताना १,४९२ रुग्ण १७.६ पॉझिटिव्हिटी दर होता.

१५ रोजी ९,६६३ चाचण्या केल्या. १५ रोजी १३.८४ टक्के असलेला पॉझिटिव्हिटी दर १ मेनंतर १६.३२ टक्के इतका झाला.

१ मे रोजी चाचण्यांची संख्या ६,९५० झाली. ११३४ रुग्ण आढळले व पॉझिटिव्हिटी दर १६.३२ इतका होता. सुटीच्या दिवशी चाचण्या कमी झाल्या.त्यामुळे चाचण्या कमी, रुग्ण कमी असेच लॉकडाऊनचे औरंगाबादचे चित्र आहे. औरंगाबाद जिल्ह्यात फक्त एकच दिवस चाचण्यांचा आकडा दहा हजार पार गेला होता.

गंभीर रुग्ण वाढतील
कोरोनाच्या काळात चाचण्यांवर सर्वाधिक जोर द्यायलाच हवा, तरच गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी करता येईल. पहिल्या स्टेजमध्ये रुग्णाचे निदान न झाल्यास तो गंभीर होईल. पर्यायाने त्याचा ताण यंत्रणेवर ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरवरील रुग्णसंख्या वाढण्यात होईल. चाचण्या कमी करणे धोकादायक आहे. -डॉ. संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशियन असोसिएशन, औरंगाबाद.

सुपरस्प्रेडर तयार होतील
सध्याच्या काळात चाचण्या वाढवण्याऐवजी कमी करणे ही बाब गंभीर आहे. त्यामुळे गंभीर रुग्ण वाढतील तसेच सुपरस्प्रेडर तयार होतील. त्याचा परिणाम रुग्णांचे मृत्यू वाढण्यात अधिक होईल. ज्या रुग्णाला कोरोना झाला असतानाही चाचण्या केल्या नाही तर तो समाजात कुटुंबात फिरून रुग्ण आणखी वाढवेल. डॉ.अशोक बेलखोडे, माजी सदस्य, मराठवाडा विकास मंडळ नांदेड.

बातम्या आणखी आहेत...