आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश पात्रता:नर्सिंगसाठी नीटच्या सक्तीविरोधी याचिकेत खंडपीठाने मागवले परिचर्या परिषदेचे म्हणणे

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय शिक्षणासाठीच्या प्रवेश पात्रता परीक्षेतील (नीट) गुणांची अट परिचारक व परिचारिका (नर्सिंग) अभ्यासक्रमासाठी लागू करण्याच्या भारतीय परिचर्या परिषदेच्या निर्णयास औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. गुरुवारी (३ नाव्हेंबर) झालेल्या सुनावणीत न्या. किशोर संत यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन प्रतिवादींना म्हणणे सादर करण्याचे स्पष्ट करत नोटीस बजावण्याचे आदेश दिले. ९ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

भारतीय परिचर्या परिषदेने ४ ऑगस्ट व १७ ऑक्टोबर २०२२ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार परिचारक आणि परिचारिका अभ्यासक्रम महाविद्यालयांना विद्यार्थी प्रवेशाचे नियम लागू केले आहेत. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण प्रवेश पात्रता परीक्षेत ११३ ते ११७ गुणांची अट लागू केली आहे. त्याचा आधार घेत महाराष्ट्र सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियेची यंत्रणा राबवली. सुरुवातीच्या फेरीत प्रवेशच होऊ शकले नाहीत. मागच्या वर्षापर्यंत नीट परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट असली तरी गुणांची गरज नव्हती. शून्य गुण असले तरी प्रवेश मिळायचा. आता एमबीबीएस आणि बीएएमएसच्या धर्तीवर गुणांची निश्चिती ठरवण्यात आली. या अटीचा प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला. भारतीय परिचर्या परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या दोन्ही परिपत्रकाच्या अटी गतवर्षीच्या बारावीची परीक्षा दिलेल्या मुलांसाठी लागू करण्यापूर्वी सर्वोच्च संस्थांची परवानगी घ्यावी लागते

असे नमूद करून खंडपीठात आव्हान देण्यात आले. रिती संजय गायकवाड आणि प्रतीक्षा पाटील यांनी याचिका दाखल केली. पर्सेंटाइलची अट बीएस्सी नर्सिंगसाठी आवश्यक नसल्याचे नर्सिंग काैन्सिलने ११ ऑगस्ट २०२१ मध्ये स्पष्ट केले आहे. संबंधित आदेश अद्यापही अबाधित आहे. नियमित बॅचसाठी ३१ ऑगस्ट कट-ऑफ डेट होती आणि अनियमित (ऑड) बॅचसाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रवेशाची मुदत असल्याने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. होण, अॅड. अश्विन होण, अॅड. चंद्रकांत जाधव, अॅड. प्रल्हाद बचाटे यांनी काम पाहिले. केंद्रातर्फे अॅड. भूषण कुलकर्णी व अॅड. रवी बांगर राज्यातर्फे अॅड. दीपक मनोरकर, अॅड. मृगेश नरवाडकर यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...