आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • In Order To Inculcate The Habit Of Reading, Activities In Municipal Schools, A School Of Nice Things Is Held On Saturdays In Municipal Priyadarshini School

वाचनाची सवय लागावी म्हणून मनपा शाळेत उपक्रम:मनपा प्रियदर्शनी शाळेत शनिवारी भरते छान-छान गोष्टींची शाळा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांची वाचनाची सवय मोडील आहे. त्यांना पुन्हा पुस्तकाची गोडी निर्माण व्हावी, शाळेची गोडी निर्माण व्हावी. अभ्यास कंटाळवाणा वाटू नये. या हेतून शहरातील शहानुरमियाँ दर्गा परिसरातील मयुरबन कॉलनीतील प्रियदर्शनी महागनर पालीकेच्या शाळेत आगळा-वेगळा प्रयोग सुरु केला आहे. इथे प्रत्येक शनिवारी गोष्टींची शाळा भरते आहे. छान छान गोष्टी कधी शाळेतील ताई तर कधी विद्यार्थी सांगतात. यामुळे गोष्टीच्या माध्यमातून शिक्षण आणि संस्कार असा आदर्श विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर ठेवला आहे.

कोरोना काळात दोन वर्ष शाळा बंद होती. ऑनलाइन वर्ग होत होते. परंतु प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यावर लक्षात आले की, विद्यार्थ्यांची एक ठिकाणी बसण्याची सवय मोडली आहे. मुलांमध्ये एकाग्रता राहिली नाही, त्यांची वाचनाची क्षमता कमी झाली आहे. चिडचिडेपणा वाढला आहे. त्यांना पुन्हा पुस्तकांमध्ये रमण्यासाठी वेगळे प्रयोग करण्याची गरज आहे. त्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी खास " गोष्टींचा शनिवार ' हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यात प्रत्येक शनिवारी शाळेच्या ग्रंथालयातील तर काही भेट म्हणून मिळालेली गोष्टींची पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी देण्यात येतात. ती पुस्तके पुन्हा जमा करुन त्यातील त्यांना आवडलेली गोष्ट मुलं त्यांच्याच वर्ग मित्रांसमोर पुन्हा सांगतात. एव्हढेच नाही तर त्या गोष्टीतून आपण काय शिकलो. याची माहितीही विद्यार्थी देतात. या प्रयोगामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मदत होते आहे. तसेच गोष्टीतून मुलांना शिकण्याचा आनंद काही वेगळाच असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

वाचन, शिक्षण अन् संस्कार

मुख्याध्यापक संजीव सोनार म्हणाले की, गोष्टींचा शनिवार यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्याबरोबरच त्यांना शिक्षणही मिळते आणि संस्कारही मिळतात. याचा चांगला प्रतिसादही मिळतो आहे.

बातम्या आणखी आहेत...