आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • In Order To Know The Real Need Of New Colleges, The University Will Get The Information From The Citizens; Online Survey To Be Conducted For The 2024 2029 Comprehensive Plan, University Of Lincoln Released On Wednesday

विद्यापीठ नागरिकांकडून जाणून घेणार माहिती:नव्या कॉलेजांची खरी गरज कळावी म्हणून शक्कल, सर्वेक्षणासाठी जारी केली लिंक

प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पुढील पाच वर्षांचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी यंदा नवी शक्कल काढली आहे. थर्स्टी एरिया अर्थात गरजेच्या ठिकाणीच कॉलेज दिले जावे, म्हणून नागरिकांकडून सुचना घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी http://online.bamu.ac.in/unic/perspective_plan_survey.php ही लिंक उपलब्ध करून दिली असून त्यावरूनच ऑनलाईन सर्वोक्षण केले जाणार आहे.

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (१ मार्च) संवैधानिक अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला प्र-कुलगुरू डॉ. श्याम सिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांच्यासह चारही अधिष्ठातांची उपस्थिती होती. बृहत आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बृहत आराखडा तयार करताना पुर्वी एकाच वर्षीचा विचार केला जात होता. यावेळी मात्र आगामी पाच वर्षांचा एकत्रित आराखडा तयार केला जाणार आहे.

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यातील नागरिक, शिक्षण तज्ज्ञ, विद्यार्थ्यांकडून सूचना मागवण्यात येणार आहेत. यासंदर्भात विद्यापीठाने प्रसिध्दीस दिलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘विद्यापीठात सर्व सन्माननीय माजी विद्यार्थी, पालक-नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षणतज्ज्ञ, माजी कुलगुरू, प्र-कुलगुरु, अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी व तत्सम व्यक्तींनी ऑनलाईन सर्व्हेक्षणात सहभागी व्हावे. वरील लिंकवर प्रश्नावली दिली आहे. त्यात सूचना, माहिती द्यावी.’ असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार सर्व्हेक्षण

१६ जानेवारी २०२३ रोजी राज्यशासनानेच तसा शासननिर्णय जारी केला आहे. नागरिकांच्या सूचनांमधूनच २०२४-२०२९ दरम्यानचा बृहत आराखडा तयार करण्यात येईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने बहुविद्याशाखीय शिक्षण आवश्यक आहे. सध्या कार्यरत महाविद्यालय आणि संस्थेत चालु असलेले अभ्यासक्रम, नवीन महाविद्यालयांच्या बाबत आपल्या भागात कोणत्या अभ्यासक्रमांची नवे महाविद्यालयांची आवश्यकता आहे..? याचे हे सर्व्हेक्षण होईल. वरील लिंकवर प्रश्नावली आहे. त्यात सूचना, माहिती द्यावी.’ असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...