आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:कोविड रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी जनतेनेच काळजी घेणे गरजेचे- विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • सुनील केंद्रेकर यांची हिंगोलीत शासकिय रुग्णालयास भेट

मराठवाड्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहेच, मात्र जनतेने काळजी घेतली तर रुग्ण संख्या कमी होईल अन निष्काळजीपणा केला तर रुग्णांची संख्या आणखी वाढेल त्यामुळे आता सर्वानीच काळजी घेतली पाहिजे असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी ता. ५ येथे केले.

हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयास त्यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनवंत माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

यावेळी केंद्रेकर यांनी रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मात्र योग्य प्रकारे आरोग्य सुविधा मिळत असल्याचे रुग्णांनी सांगितले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना केंद्रेकर म्हणाले की, कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी आता जनतेने काळजी घेतली पाहिजे. जनतेने काळजी घेतली तर रुग्णांची संख्या कमी होईल. हिंगोली जिल्ह्यात आगामी काळात लॉकडाऊन करायचा किंवा नाही याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी हे निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले. नागरीकांनी काळजी घ्यावी अन लसीकरण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

तत्पुर्वी केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. कोविड रुग्णांचे काँटॅक्ट ट्रेसींग तसेच संशयीत रुग्णाच्या चाचण्या वाढवाव्यात, पोलिस विभागानेही त्यांना दिलेल्या सुचनांनुसार कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.

जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये जनावरांचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी वन विभागाने जंगलात पानवठे वाढवावेत. या शिवाय रस्त्याच्या काठावरही जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून ठेवावेत. जिल्हा परिषदेने सुंदर माझे कार्यालय, सुंदर माझे गाव या अभियानाकडे लक्ष द्यावे. प्रत्येकाने आपापले कार्यालय स्वच्छ ठेवावे, सुंदर माझे गाव अभियान राबवावे तसेच सर्वच यंत्रणांनी वृक्षलागवडीवर भर देण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या कामाचे कौतूक

शहरातील रामलिला मैदान येथे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी भेट दिली. मैदानाचे सपाटीकरण व इतर कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रत्येक शहर व गावातील मैदाने असलीच पाहिजेत असे त्यांनी सांगितले. हिंगोलीत झालेले काम पाहून त्यांनी जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या कामाचे कौतूक केले.

बातम्या आणखी आहेत...